रिसोड नप अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे भगवान क्षीरसागर विजयी

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
रिसोड ,
Risod Municipal Election, रिसोड नगरपरिषद निवडणुकीच्या दिनांक २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणी मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली असल्याचे दिसून आले.अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भगवानदादा क्षिरसागर व महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे सुधाकर देशमुख उर्फ बाळासाहेब यांचे मध्ये थेट लढत झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र या लढत मध्ये भारतीय जनता पार्टीचे भगवान क्षिरसागर यांनी बाळासाहेब देशमुख यांचा ९१३ मतांनी पराभव केला.
 

Risod Municipal Election, 
प्रभाग निहाय झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ९, काँग्रेसला ८,तसेच शिवसेना शिंदे गटाला ५ जागा मिळाल्या. यासह १ नगरसेवक अपक्ष निवडून आला. यासह प्रभाग निहाय झालेल्या मतमोजणी मध्ये अत्यंत चुरशीचे निकाल पाहायला मिळाले. या निकालामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसच्या फरहाना परविण शेख समिर यांनी एमआयएमच्या रिजवाना परवीन अफजल शहा यांचा ३७४ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १ ब मध्ये काँग्रेसचे सिकंदर खान खाजा खान यांनी वंचित चे सलमान अली तमिजली यांचा १५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेनेचे संतोष लक्ष्मण चराटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रज्ञा सागर अग्रवाल यांचा ११२ मतांनी पराभव केला. या ठिकाणी महायुती असूनही मैत्रीपूर्ण लढत झाली होती. प्रभाग क्रमांक २ ब मध्ये भाजपाच्या माधुरी स्वप्निल इरतकर यांनी वंचितच्या सायमा परवीन शेख वसीम यांचा २८७ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये भाजपाचे किरण क्षीरसागर यांनी शिवसेना उबाठा चे शीतलकुमार धांडे यांचा ४६८ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ३ ब मधे शिवसेनेच्या लक्ष्मी क्षिरसागर यांनी शिवसेना उबाठाच्या संगीता देशमुख यांचा १९५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ४ अ मधे शिवसेनेच्या रूपाली भगत यांनी काँग्रेसच्या पप्पीबाई कदम यांचा २२४ मतांनी पराभव केला.प्रभाग ४ ब मधे शिवसेनेचे विष्णू जाधव यांनी काँग्रेसचे पवार प्रवीण देविदास यांचा ४५५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेसच्या सुरेखा दांदडे यांनी भाजपाच्या उषादेवी गायकवाड यांचा ३२५ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक ५ ब मध्ये काँग्रेसचे बंडू रामकिसन वानखेडे यांनी भाजपाचे पवन छित्तरका यांचा १३९ मतांनी पराभाव केला. प्रभाग क्रमांक ६ अ मध्ये भाजपाच्या प्रीती रामेश्वर जोगदंड यांनी शिवसेना उबाठा गटाचे अनंत तुकाराम शिंदे यांचा ४२२ मतांनी पराभव केला.प्रभाग क्रमांक ६ ब मध्ये भाजपाच्या स्नेहा अमोल लोथे यांनी काँग्रेसच्या शिबा परविन सलीम खान यांचा ४७५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये भाजपाच्या वैदेही केदारे यांनी अपक्ष लीना निर्बाण यांचा अवघ्या ३ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ७ ब मधे भाजपाचे संजय बगडीया यांनी अपक्ष उमेदवार मोहसीन अहेमद यांचा २१८ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ८ अ मध्ये भाजपाच्या जया नाकवाल यांनी काँग्रेसच्या माया मोरे यांचा ४८७ मतांनी पराभव केला.८ ब मधे भाजपाचे कृष्णा आसनकर यांनी उबाठा चे दिलीप रासकर यांचा ३०१ मतांनी पराभव केला.प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अपक्ष उमेदवार सतीश इरतकर यांनी भाजपाचे विकास झुंगरे यांचा १६३ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ९ ब मधे शामली डांगे यांनी काँग्रेसच्या रेश्मा शेख यांचा १८ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १० अ मधे शितल वानखेडे यांनी भाजपाच्या अंजली देशमुख यांचा २८८ मतांनी पराभव केला. प्रभाग १० ब मधे शिवसेनेचे विष्णू कदम यांनी उबाठाचे संजय इरतकर यांचा ३७९ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ११ मधे काँग्रेसच्या शबाना बी यांनी शिवसेनेच्या वर्षा चोपडे यांचा ३७० मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ११ ब मधे काँग्रेसच्या महेफुजा परवीण यांनी शिवसेनेच्या रइसाबी यांचा ३८२ मतांनी पराभव केला.प्रभाग क्रमांक ११ क मध्ये काँग्रेसचे अकबर खान यांनी भाजपाचे संतोष बाबर यांचा २६ मतांनी पराभव केला. सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत आपापले नेत्यांचे कार्यालय गाठून या ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा दिल्या फटायांची आतिषबाजी गुलाल व घोषणांनी रिसोड शहर अक्षरशः दुमदुमले होते.
सदर मतदान मोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात अत्यंत चोख रित्या शिस्तप्रिय व शांततेने मतदान मोजणी प्रक्रिया पार पडली. यासाठी निवडणूक कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले. रिसोड तहसील कार्यालय येथे सदर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. गेली १९ दिवसापासून नागरिकांना याबाबत निकालाची कमालीची उत्सुकता होती.
छायाचित्र - विजयाचा आनंदोत्सव साजरा करतांना भाजपा नेते व समर्थक