वृक्षित फाउंडेशनतर्फे स्पृहणीय स्वच्छता उपक्रम

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Vrikshit Foundation आज सकाळी ७:०० वाजता फुटाळा परिसरात वृक्षित फाउंडेशन या स्वयंसेवी सेवाभावी संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
 
Vrikshit Foundation
 
स्वच्छतेदरम्यान संस्थेच्या सर्व सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले की, फिरण्यासाठी व वेळ घालवण्यासाठी येताना फुटाळा परिसराचे सौंदर्य अबाधित ठेवावे आणि कचरा करू नये. Vrikshit Foundation फुटाळा हे केवळ फिरण्याचे ठिकाण नसून नागपूरची ओळख आहे, त्यामुळे त्याची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
 
या परिसरात मोठ्या प्रमाणावर अधिकृत व अनधिकृत फेरीवाले असून, त्यांच्या व ग्राहकांच्या माध्यमातूनही कचरा पसरवला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फेरीवाल्यांनी व नागरिकांनी डस्टबिनचा वापर करावा, याकडे महापालिकेने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. Vrikshit Foundation इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच फुटाळा परिसरातही पुरेशा प्रमाणात डस्टबिन्स व नियमित स्वच्छतेची आवश्यकता असून, परिसर आपला असल्याने त्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारीही आपलीच आहे, असा संदेश वृक्षित फाउंडेशनतर्फे देण्यात आला.
सौजन्य: अंजली वाघये, संपर्क संपर्क मित्र