अमरावती जिल्ह्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष

काँग्रेस द्वितीय, तृतीयस्थानी अपक्ष

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
अमरावती,
Amravati Election Results : जिल्ह्यातल्या १० नगरपरिषद व २ नगर पंचायत निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांचे नगराध्यक्ष पदाचे ६ तर नगरसवेक पदाचे १०२ उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेस द्वितीय तर अपक्ष तृतीयस्थानी आहे. २७८ सदस्यपदाच्या व १२ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान झाले. त्याची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजतापासून १२ वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाली.
 
 
 
amt
 
 
 
अचलपुरात भाजपाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार रूपाली माथने विजयी झाल्या तर भाजपाचे ७ सदस्य, काँग्रेसचे १५, अपक्ष १०, प्रहारचे २, एमआयएम ३, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ सदस्य विजयी झाले. धामणगाव रेल्वेत भाजपाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार अर्चना रोठे - अडसड विजयी झाल्या तर सदस्य पदाचे भाजपाचे सर्व २० उमेदवार विजयी झाले. अन्य कोणत्याच पक्षाला येथे खाते उघडता आले नाही. अंजनगाव सुर्जीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश गायगोले विजयी झाले तर भाजपाचे ६ सदस्य, काँग्रेसचे ९, शिवसेना शिंदेचे ३, उबाठाचे ७, समाजवादीचे २, अपक्ष १ उमेदवार सदस्यपदासाठी विजयी झाला. धारणीत भाजाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चौथमल विजयी झाले तर भाजाचे ४ सदस्य, काँग्रेसचे ८, अपक्ष ३, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित यांचा प्रत्येकी १ सदस्य विजयी झाला. शेंदूरजना घाट येथे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा वरखडे विजयी झाल्या तर भाजपाचे ११ सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार ६, शिवसेना शिंदे २, अपक्ष १ सदस्य विजयी झाला. वरूड येथे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वर सलामे विजयी झाले तर भाजपाचे सदस्यपदाचे १८, राष्ट्रवादी अजित ४, काँग्रेस २, प्रहार व अपक्ष प्रत्येकी १ सदस्य विजयी झाला.
 
 
दर्यापूर येथे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे विजयी झाल्या तर काँग्रेसचे सदस्य पदाचे १७, भाजपाचे ४, शिवसेना शिंदेचे २, दोन्ही राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ सदस्य विजयी झाला आहे. चिखलदार नगरपरिषदेत काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी झाले तर काँग्रेसचे सदस्य पदाचे १२, भाजपाचे ८ उमेवार विजयी झाले आहे. चांदूर रेल्वे नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी झाल्या. येथे सदस्यपदासाठी भाजपाचे ११, काँग्रेसचे ४, वंचित बहुजन आघाडीचे २, अपक्ष २, माकपाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना उबाठाच्या प्राप्ती मारोडकर विजयी झाल्या. येथे सदस्यपदासाठी उबाठाचे ४, प्रहार व राष्ट्रवादी अजितचा प्रत्येकी १, भाजापाचे ३, काँग्रेसचे ५, राष्ट्रवारदी शरदचंद्र ३ उमेदवार विजयी झाले आहे. मोर्शीत नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा गुल्हाने विजयी झाल्या आहेत. येथे राष्ट्रवादी शरदचंद्रचे ६, राष्टवादी अजितचे २, भाजपा ६, अपक्ष २, शिवसेना शिंदे २, प्रहार १, काँग्रेसचे ५ सदस्यपदाचे उमेदवार विजयी झाले आहे. चांदूर बाजार येथे प्रहारचे नगराध्यक्ष पदाच्या मनिषा नांगलिया वियजी झाल्या आहे तर प्रहारचे सदस्यपदाचे १३, भाजपाचे २, अपक्ष २, काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ सदस्य विजयी झाला आहे.
 
 
पक्षनिहाय सदस्यपदाच्या विजयी जागा
 
 
भाजपाचे १०२, काँग्रेस ७८, अपक्ष २२, राष्ट्रवादी अजित पवार, १८, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ११, शिवसेना उबाठा ११, शिवसेना शिंदे १०, प्रहार १८, एमआयएम ३, वंचित आघाडी २, समाजवादी २, माकपा १ असे सदस्य पदाचे उमेदवार विजयी झाले आहे. एकूण २७८ जागा होत्या.