आर्वीच्या नगराध्यक्ष स्वाती गुल्हाणे!

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
आर्वी,
swati-gulhane : दोन आमदार आणि एक खासदार असलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या स्वाती गुल्हाने यांनी काँग्रेसच्या अंजली जगताप यांचा २६१९ मतांनी पराभव केला. भाजपाच्या स्वाती गुल्हाने यांना १० हजार ८२० तर काँग्रेसच्या अंजली जगताप यांना ८२०१ मिळाले. २५ नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला १४, काँग्रेस २, शरद पवार गटाचे ७, राष्ट्रवादीचे १, उभाठाचे १ नगरसेवक निवडून आले. युवा आणि दूरदृष्टीचे अशी ओळख असलेले आ. सुमीत वानखेडे यांच्या नेतृत्वातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. तर भाजपाचे नेते सुधीर दिवे येथे तळ ठोकून होते. विशेष म्हणजे येथे काँग्रेसचे एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासात चोरी गेले होते. ही निवडणूक भाजपानेही अतिशय शांत डोयाने लढवली. भाजपात जाहीर आरोप प्रत्यारोप न झालेली ही एवढ्यातील पहिलीच निवडणूक म्हणावी लागेल.
 
 
jk
 
येथे प्रभाग १ मधून शरद पवार गटाच्या शितल मोहोड (८७०), भाजपाचे लवेश गलोले (८५२) विजयी झाले आहे. प्रभाग २ काँग्रेसच्या प्रियंका भिमके (९०१), काँग्रेसचे पंकज वाघमारे (९३९), प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादीच्या भारती पोटफोटे (६६६) तर भाजपाचे देवीदास साठे (५४१), प्रभाग ४ येथुन शरद पवार गटाचे गोंविंदा उईके (९०८) तर ज्ञानेश्वरी जाचक (१०३१), प्रभाग ५ मध्ये उबाठाचे योगेश गावंडे (८०७) शरद पवार गटाचे वंदना देवघरे (७५७), प्रभाग ६ मधून भाजपाचे मनोज आगरकर (१०४२), कांता कसर (७७६), प्रभाग ७ भाजपाचे संजय थोरात (१००८), संपदा जोशी (८७०), प्रभाग ८ मध्ये शरद पवार गटाच्या हेमलता जाधव (९२०) तर भाजपाचे जगन गाठे (९१८), प्रभाग ९ भाजपाच्या शुभांगी गाठे (८८६) अजय कटकमवार (७१४), प्रभाग १० भाजपाच्या उषा सोनटक्के (७८०), संजय राऊत (६२९), प्रभाग ११ भाजपाच्या उर्मिला पवार (१०६९), गौरव राजकुमार जाजू (१२०५), प्रभाग १२ शरद पवार गटाचे नितीन लोहे (११५७), प्रतिभा गिरी (१४४९) भाजपाचे खान महताब खातून युसूफ (११०३) हे विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित, मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.