शिरोळयात अशोकराव माने यांची घराणेशाही हद्दपार

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
कोल्हापूर,
Ashokrao Mane was shocked कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल दिसून आले आहेत. शिरोळ तालुक्यातील आमदार अशोकराव माने यांना मोठा झटका बसला असून, त्यांची घराणेशाही मतदारांनी पूर्णपणे हद्दपार केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माने यांच्या सून सारिका अरविंद माने यांचा आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मुलगा अरविंद अशोकराव माने यांचा पराभव झाला. मतदारांनी त्यांच्या पुतण्यालाही घरचा रस्ता दाखवला. यामुळे भाजपच्या ताराराणी आघाडीला मोठा झटका बसला असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रचाराचा प्रभावही काहीसा दिसला नाही.
 
 
Ashokrao Mane
 
शिरोळ नगरपरिषदेत यादव गटाने जोरदार कामगिरी करत नगराध्यक्ष योगिता कांबळे आणि 15 नगरसेवकांवर विजय मिळवला. भैय्या गटाला 3 आणि अपक्षाला 2 नगरसेवक जागा मिळाल्या. दुसरीकडे, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये जनसुराज्यच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड या चार ठिकाणी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले मात्र गडहिंग्लज आणि कागलमध्येच विजय मिळाला. काँग्रेसने फक्त पेठवडगाव आणि शिरोळमध्ये विजय मिळवला. शिरोळ तालुक्यातील मतदारांनी स्थानिक घराणेशाहीला हद्दपार करत यादव गटाला पूर्ण बहुमत दिले, तर कोल्हापूर जिल्ह्यात विविध आघाड्यांमध्ये रंगीत लढती दिसल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगराध्यक्षपदांचे निकाल
काँग्रेस: 2 (पेठवडगाव, शिरोळ)
शिवसेना UBT: 0
राष्ट्रवादी SP: 0
मनसे: 0
जनसुराज्य: 2 (पन्हाळा, मलकापूर)
भाजप: 3 (चंदगड, हुपरी, भाजप)
शिवसेना शिंदे: 4 (जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड, कुरुंदवाड)
राष्ट्रवादी: 2 (गडहिंग्लज, कागल)