पराग मगर
नागपूर,
Ashok Patel अशाेकजी माझ्या साेबतच राहायचे. साेबतच जेवण करायचाे. सुखदुःखही सारखी हाेती. त्यांचं साहित्य अजूनही इथेच आहे. मनात प्रचंड असुरक्षितता आहे. कंपनीत जाण्याचीही भीती वाटत आहे. हिशाेब करावा आणि थेट घरी निघून जावं असं वाटतं, ही अगतिक भावना मृत अशाेक पटेल यांच्या साेबत राहणारा सहकारी मूळचा बनारस येथील शुभम वर्मा याने व्यक्त केली.
अवादा कंपनीतील दुर्घटनेत मरण पावलेले कामगार हे जवळच्याच दुधा गावात राहत हाेते. यातील मृत अशाेक पटेल यांच्या साेबत राहणारा शुभम सांगताे घटना घडली तेव्हा मी घटनास्थळापासून काही अंतरावर दुसऱ्या युनिटमध्ये हाेताे. आपल्या साेबत राहणारे अशाेकजी यांच्यासाेबत असे काही हाेईल, असे वाटलेही नव्हते. त्यांचे साहित्य अजूनही तसेच पडले आहे. आज त्यांच्यासाेबत ही घटना घडली. उद्या कुठल्याही कामगारासाेबत काहीही घडू शकते. त्यामुळे आपला ठेकेदाराला भेटून आपला हिशाेब करावा आणि निघून जावं अशी भावना शुभम बाेलून जाताे.
संपावर असताे तर ही घटना घडलीच नसती
महिन्याला Ashok Patel 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ठेकेदार कामगारांचे वेतन करायचा. परंतु 19 तारीख चार दिवसांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांनी दाेन दिवसांपूर्वी संप पुकारला हाेता. त्यानंतर ठेकेदाराने दिलेल्या शब्दाखातर कामगार कामावर गेले हाेते. आम्ही संपाच्या भूमिकेवर ठाम असताे आणि कामावर गेलाेच नसताे तर ही घटना घडलीच नसती आणि कुणीचाच जीव गेला नसता असे यातून बचावलेले विनाेद यादव यांनी सांगितले.
कर्ज हाेते...अखेरचे वेतन झालेच नाही
शुभम सांगताे, अशाेक पटेल हे बिहारच्या माेतिहारी येखील रहिवासी हाेते. माेठा परिवार हाेता आणि परिवाराशी हाेत असलेल्या संभाषणावरून त्यांच्यावर खूप कर्ज हाेते असे लक्षात यायचे. त्यामुळे ते कधी पगार हाेताे आणि कधी घरी पैसे पाठवताे ही त्यांची तगमग असायची. त्यामुळे कधीच ते जास्त खर्च करीत नव्हते. संप सुरू हाेता तेव्हाही त्यांना पैसे कापले जातील याचीच भीती हाेती. त्यामुळे घटनेच्या दिवशी ते आवर्जून कामावर गेले. विशेष म्हणजे ज्या पगाराची ते वाट पाहत हाेते ताे पगार त्यांच्या खात्यात शेवटच्या दिवशी पर्यंत पाेहचलाच नाही.