attack-on-woman-for-not-wearing-hijab सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या दोन व्हिडिओंमुळे बांगलादेशातील परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. तरुण सामाजिक कार्यकर्ते उस्मान हादीच्या हत्येनंतर महिलांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांचे हे व्हिडिओ असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे देशातील कायदा-सुव्यवस्थेबाबत संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

एका व्हायरल पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की पाश्चात्त्य कपडे परिधान केले असून बुर्का किंवा हिजाब न घातल्यामुळे एका ख्रिश्चन महिलेला पुरुषांच्या गटाने मारहाण केली. attack-on-woman-for-not-wearing-hijab दुसऱ्या पोस्टमध्ये बुर्का आणि हिजाब न परिधान केल्याच्या कारणावरून दोन मुस्लिम महिलांवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे दावे ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, हादीच्या मृत्यूनंतर देशातील परिस्थिती किती ढासळली आहे, याचे हे उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे या प्रकरणांबाबत बातमी लिहिली जात असताना बांगलादेशी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. मात्र या पोस्ट्समुळे सध्याच्या अस्थिर वातावरणात महिलांची सुरक्षितता, धार्मिक स्वातंत्र्य आणि वाढता सांप्रदायिक तणाव यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
इंकलाब मंच या व्यासपीठाशी संबंधित युवा नेता आणि संघटक शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर देशात तणाव अधिक वाढला आहे. २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनाशी जोडलेले असलेले हादीला १२ डिसेंबर रोजी ढाकामध्ये नकाबपोश हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ढाका तसेच इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. attack-on-woman-for-not-wearing-hijab आंदोलनादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्या, तर काही ठिकाणी माध्यमांची कार्यालये आणि राजकीय ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अंतरिम सरकारने या हत्येला “पूर्वनियोजित कट” असे संबोधले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास मोहीम राबवली जात आहे. तसेच आरोपींबाबत माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
दरम्यान, महिलांवर कथित हल्ल्यांचे व्हिडिओ आणि दावे मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता अधिक तीव्र झाली आहे. संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक भागांमध्ये पोलीस आणि अर्धसैनिक दल तैनात केले असले तरी, देशातील काही भागांमध्ये तणावपूर्ण वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे. attack-on-woman-for-not-wearing-hijab ड्रेस किंवा धार्मिक ओळखीवरून झालेल्या हल्ल्यांच्या आरोपांवर अद्याप अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नसली, तरी सध्याच्या अस्थिर परिस्थितीत संयम राखण्याची, जबाबदारी निश्चित करण्याची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे.

