चिखली नगरपालिकेत भाजपाचा झेंडा!

नगरसेवकपदी १३ भाजप, १२ काँग्रेस, २ इतर पक्ष

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
चिखली,
BJP in Chikhli Municipality चिखली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा आपल्या वर्चस्वाचा ठसा उमटवला आहे. नगराध्यक्षपदी पंडितराव देशमुख विजयी ठरले असून त्यांच्यासह नगरसेवकपदी भाजपाचे १३, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी (अ. प.) एक, शिवसेना एक आणि राष्ट्रवादी (श. प.) एक असा निकाल नोंदवला गेला आहे. नगराध्यक्षपदासाठी पंडितराव देशमुख यांना एकूण १६,२३० मतं मिळाली, तर त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे काशिनाथ बोंद्रे यांना १३,८४८ आणि राष्ट्रवादी (अ. प.) निलेश गावंडे यांना ८,००१ मतं मिळाली. निकाल जाहीर होताच भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
 
 

chikhali 
विजयानंतर चिखली शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, विजयी नगरसेवक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातील प्रमुख मार्गांवर ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार सौ. श्वेताताई महाले उपस्थित होऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन केले.
 
नगरपालिकेच्या प्रभागनिहाय निकालानुसार विजयी नगरसेवक पुढीलप्रमाणे आहेत:
प्रभाग १ – चव्हाण सुषमा विलास भाजपा), डॉ. गावंडे मिनल निलेश (राष्ट्रवादी - अ. प.)
प्रभाग २ – डॉ. प्रकाश शिंगणे (राष्ट्रवादी श. प.), खेडेकर वैशाली कपिल (शिवसेना)
प्रभाग ३ – शिंगणे सुनिता प्रकाश (काँग्रेस), शेख रफीक कादर (भाजपा)
प्रभाग ४ – दिपक विश्वनाथ खरात (भाजपा), वहिदा बेगम मोहम्मद जकाउल्ला (काँग्रेस)
प्रभाग ५ – देव्हडे सीमा गोपाल (काँग्रेस), मोहम्मद इसरार अ. जब्बार (काँग्रेस)
प्रभाग ६ – खबुतरे अमोल सुरेश (भाजपा), शितल संतोष देशमुख (काँग्रेस)
प्रभाग ७ – संध्या आनंद बोंद्रे (काँग्रेस), खान उबेद अली शब्बीर अली (काँग्रेस)
प्रभाग ८ – बनसोडे प्रिया राम (भाजपा), सुहास रामकृष्ण शेटे (भाजपा)
प्रभाग ९ – ज्योतीताई भगवानराव वाळेकर (भाजपा), गुरुदत्त विनायक सुसर (भाजपा)
प्रभाग १० – शिनगारे रत्नदिप यशवंत (काँग्रेस), लहाने स्वाती अमोल (काँग्रेस)
प्रभाग ११ – सरस्वती पुरुषोत्तम वायाळ (काँग्रेस), दिपक बुलचंद वाधवाणी (भाजपा)
प्रभाग १२ – सुप्रिया प्रशांतकुमार भटकर (काँग्रेस), मो. आसीफ मो. शरीफ (काँग्रेस)
प्रभाग १३ – विष्णु येडूजी जोगदंडे (भाजप), देव्हडे विमल रामदास (भाजपा)
प्रभाग १४ – अश्विनी विश्वनाथ (बाळू) जाधव (भाजपा), मोहित धनंजय व्यवहारे (भाजपा)