जिल्ह्यातील ११ नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे निवडणूक निकाल जाहिर

शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी शपा, अपा, उबाठा प्रत्येकी १

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Buldhana Municipal Council President: BJP 4 जिल्ह्यातील ११ नगर पालिका नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणूकीचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी घोषित करण्यात आला. यानिवडणूकीत सर्वाधिक नगराध्यक्ष भाजप ४, काँग्रेस३, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी शपा, अपा, उबाठा प्रत्येकी १ नगराध्यक्ष निवडूण आले आहे. महायुती व महाविकास आघाडी यांनी स्वबळावर उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यामुळे सर्व आजी माजी आमदार मंत्री यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही ठिकाणी अपेक्षित तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याने निकाल घोषित झाल्यानंतर कही खुशी कही गम चे वातावरण दिसून आले.
 
 
 
buldhan
 
 
जिल्हयात भाजपचे चार नगराध्यक्ष निवडूण आले त्यामध्ये चिखली पंडीतराव रामराव देशमुख, खामगांव अर्पणा सांगर फुंडकर, जळगाव जामोद गणेश रामेश्वर दांडगे, नांदूरा मंगला सुधीर मुर्‍हेकर, काँग्रेस लोणार मिरा भूषण मापारी, मलकापूर अतिकूर रहमान शपिकूर रहमान, शेगांव प्रकाश एकनाथ शेगोकार, बुलढाणा शिवसेना शिंदे पुजा संजय गायकवाड, देऊळगावराजा राष्ट्रवादी अपा माधूरी तुषार शिपणे, सिंदखेडराजा राष्ट्रवादी शपा सौरभ विजय तायडे, मेहकर उबाठा सेना किशोर भास्कर गारोळे यांचा समावेश आहे.