सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना चालान

- बजाज नगर पोलिसांचा धडाका

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
challans-cigarette-smokers : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरोधात बजाज नगर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून, सेंट्रल बाजार रोडवर विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांना चलान बजावण्यात आले. या मार्गावर युवकांचे गट उघडपणे धूम्रपान करत असल्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच पोलिसांच्या निरीक्षणातही हा प्रकार सातत्याने आढळून येत होता. या पार्श्वभूमीवर बजाज नगर पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबवली.
 
 
 
ngp
 
 
 
मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सिगारेट ओढताना आढळलेल्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करत चलान देण्यात आले. संबंधित चलानांद्वारे नियमभंग करणाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धूम्रपानावर निर्बंध घालण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सेंट्रल बाजार रोडसारख्या वर्दळीच्या भागात सार्वजनिक धूम्रपानामुळे नागरिकांना त्रास होत असून तरुणांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे अशा ठिकाणी यापुढेही नियमित तपासणी मोहीम राबवली जाईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे बजाज नगर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.