हिंगणघाटचे बच्चे आंतरराष्ट्रीय बायोसियुरिटी स्पर्धेत चमकले

जिनिव्हा येथील कार्यक्रमात शोधनिबंध सादर

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट,
Children from Hinganghat at international level जागतिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या ‘९ वी नेस्ट जनरेशन फॉर बायोसियुरिटी कॉम्पिटिशन २०२५’ मध्ये मूळ हिंगणघाट येथील श्रेयश बोरकर व त्याच्या आंतरराष्ट्रीय चमूने विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील बक्षीस म्हणून या टीमला स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे प्रवास करण्याची तसेच तिथे आयोजित विशेष कार्यक्रमात आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळाली. ही स्पर्धा न्यूलिअर थ्रेट इनिशिएटिव्ह, संयुक्त राष्ट्रांचा निशस्त्रीकरण विभाग आणि इतर जागतिक संस्थांच्या संयुत विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन’ म्हणजे काय? हा १९७५ साली अमलात आलेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे. या करारांतर्गत मानव, प्राणी आणि वनस्पती यांना हानी पोहोचवणार्‍या जैविक शस्त्रांच्या म्हणजेच रोगजंतूंच्या वापरावर आणि निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे. या कराराला आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, ५० वर्षांत विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे.
 
 
hinganghat
 
 
त्यामुळे, या स्पर्धेसाठी जगभरातील तरुण संशोधकांना एक कूटप्रश्न विचारण्यात आला होता. बदलत्या युगात आपण जैविक शस्त्रांची व्याख्या पुन्हा कशी करायला हवी? विजेती टीम आणि त्यांचे संशोधन या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी श्रेयश बोरकर (युनिव्हर्सिटी ऑफ त्यूबिंजन, जर्मनी), श्रीराम कुमार (युनिव्हर्सिटी ऑफ मन्स्टर, जर्मनी) आणि कैटलिन कॉनर्स (जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी, अमेरिका) या तिघांनी एक टीम म्हणून काम केले. त्यांच्या या शोधनिबंधाची परीक्षकांनी विजेते म्हणून निवड केली. त्यांनी अतिशय साध्या पण महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधत सध्याच्या मानव, प्राणी, वनस्पती व्याख्येत समाविष्ट नव्हते. पायाभूत सुविधांचे नुकसान सध्याचा करार फत सजीवांच्या रक्षणावर भर देतो. पण श्रेयशच्या टीमने जर काही सूक्ष्मजीव हे धातू, प्लास्टिक किंवा इंधनासारख्या निर्जीव गोष्टी नष्ट करण्यासाठी वापरले गेले तर ते देशाच्या पायाभूत सुविधा कोलमडून टाकू शकतात. त्यामुळे सजीवांसोबतच या निर्जीव गोष्टींच्या सुरक्षेचाही समावेश
 
जैविक शस्त्रांच्या व्याख्येत व्हायला हवा. आज बायोलॉजी व संगणक हे एकमेकांशी जोडलेले आहेत. सायबर हल्ल्याद्वारे लॅबमधील माहिती बदलून धोकादायक प्रयोग केले जाऊ शकतात, हा आधुनिक धोकाही त्यांनी अधोरेखित केला.बक्षीस आणि सादरीकरण स्पर्धा जिंकल्यामुळे प्रायोजित केलेल्या बक्षीसाचा भाग म्हणून तिघांना ८ ते १२ डिसेंबर दरम्यान जिनिव्हा येथे होणार्‍या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. श्रेयश जिल्हा परिषद शिक्षक प्रमोद व हर्षा बोरकर यांचा मुलगा आहे. त्याचे शालेय शिक्षण नवोदय विद्यालय, वर्धा येथे झाले आहे. तो जर्मनीमध्ये पीएचडी करत आहे.