परभणी,
Dhananjay Munde's sister wins राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या नगरपंचायतीसाठी माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि त्यांनी जोरदार विजय मिळवला आहे. यावेळी धनंजय मुंडेही विजयोत्सवात उपस्थित राहिले आणि बहिणीचे अभिनंदन केले.
उर्मिला केंद्रे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या आणि स्थानिक मतदारांनी त्यांना भरभरून पसंती दिली. यावेळी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार काही प्रभागात आघाडीवर राहिला असला तरी बहिणीच्या विजयानंतर मुंडे कुटुंबाचा प्रभाव पुन्हा सिद्ध झाला आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण सात नगरपालिकांच्या निकालात चुरशीची लढत दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन नगरपालिकांमध्ये आघाडी राखली, तर जिंतूरमध्ये भाजप आघाडीवर आहे.