नीतेश कराळेवर गुन्हा दाखल करा

*सकल हिंदू समाज संघटनेचे ठाणेदारांना निवेदन

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
nitesh-karale : सनातन धर्माची ओळख, कोट्यवधी श्रद्धाळूंची आस्था आणि संत परंपरेचा गौरव असलेल्या कुंभमेळ्याबाबत, संबांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या शरद पवार गटाचे प्रवते नीतेश कराळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
 
 
 
nitesh
 
 
 
नीतेश कराळे याने १४ डिसेंबर रोजी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये कुंभमेळा, संत, साधू आणि धर्माशी संबंधित पवित्र परंपरांबाबत अवमानकारक व उपरोधिक शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट अल्पावधीतच समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झाला. वर्धा येथील कराळे स्वत: व्यवसायाने शिक्षक आहे. त्याने काही दिवसांपूर्वी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हिंदू धर्मियांच्या साधू-संतांबद्दल भावना दुखावणारे विधान केले. त्यात निश्राधार आरोप, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे समाजात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शयता असल्याचे निवेदनात नमूद आहे.
 
 
याप्रकरणाची सखोल चौकशी करून कराळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाज संघटनेचे यश बालपांडे, सुशांत गिरडकर, शिवम तडस, अनिकेत ठाकरे, नीतेश चव्हाण, राहुल सोरते, कुणाल भोयर, तेजस मुटे, करण पोकळे, मयूर डांगरे, राहुल घोडे, मंथन कारनकर, अमोल गवळी, किशोर डकरे, प्रभाकर तडस, विवेक मांडवकर आदींनी केली आहे.