मुंबई,
Maharashtra cold wave राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. काही ठिकाणी तापमान ४.५ ते ५ अंशावरती पोहोचलं आहे. तर पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे चित्र सध्या दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 22 डिसेंबर रोजी कडाक्याची थंडी जाणवू शकते. तसेच, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये २५ डिसेंबरनंतर थंडीचे प्रमाण वाढू शकते.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या संकेतांनुसार, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘कोल्ड वेव’चा इशारा जाहीर केला आहे. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये २५ डिसेंबर नंतर किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.उत्तर भारतात धुके आणि ठंडी वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावरही थोडा परिणाम होऊ शकतो. खास करून उत्तर भारतातील शीतलहरी आणि वातावरणातील बदलांचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसत आहे. यासोबतच, गल्फ ऑफ मन्नार आणि आसपासच्या भागात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे समुद्रात 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिसू शकतो.
रात्री आणि पहाटेच्या वेळी तापमानात घट
रात्री आणि पहाटेच्या वेळी Maharashtra cold wave किमान तापमानात घट होऊन गारवा वाढणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत थंडीची लाट जाणवू शकते, तर अन्य भागांतील हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या यंदाच्या अंदाजानुसार, लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेले रुग्ण यांच्यासाठी पुढील काही दिवस अधिक काळजीचे असू शकतात. हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना खास करून मध्य महाराष्ट्रात थंडीचे जोरदार प्रमाण पाहता, लहान मुलांना आणि वृद्धांना बाहेर जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, गरम कपडे परिधान करणे, कोमट पाण्याचा वापर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.उत्तर भारतातील दाट धुके आणि थंडीमुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकाची पुन्हा तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
सामान्यत: महाराष्ट्रात हा बदल 21 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 25 डिसेंबरपर्यंत याचे परिणाम दिसून येतील. राज्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली, तर थंडीच्या या घटकांवर यशस्वीपणे मात करता येईल.