जनतेतून नगराध्यक्षाचा बहुमान राष्ट्रवादीला

अशोक परळीकर जनतेतून विजयी

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
Mangrulnath Municipal Election, येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागला असून, त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अशोक परळीकर हे जनतेतून विजयी झाले असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. दिलीप रत्नपारखी पराभूत झाले आहेत.
 

Mangrulnath Municipal Election, NCP victory Mangrulnath 
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या अटीतटीच्या निवडणुकीत अशोक परळीकर, राष्ट्रवादी(अजित पवार गट) ९०४४ एकूण मते मिळाली असून ४४९० मतांनी विजयी झाले आहेत.भाजपाचे डॉ. दिलीप रत्नपारखी यांना ४५५४ एकूण मते मिळाली आहेत. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १अ) लता पुरुषोत्तम चितलांगे भाजप ९४४ मते,,ब) अनिल गावंडे भाजप १०९४ मते,प्रभाग क्रमांक २ अ) फैसल खान शफी खान,अपक्ष ७३६ मते,ब) सायराबानो जा. शब्बीर खान, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ९७८ मते, प्रभाग क्रमांक ३ अ) बिलाल अहमद अब्दुल अकील,अपक्ष ५२९ मते, ब) शबाना परविन मिर्झा अझहर, काँग्रेस ८२४ मते, प्रभाग क्रमांक ४ अ) शेर बानो मोहम्मद जमीर कुरेशी, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ११८६ मते, ब) नसीम परविन लतीफ खान राष्ट्रवादी (अजित पवार गट) १०१५ मते, प्रभाग क्रमांक ५ अ) साहेल खादीजा अब्दुल वाहिद (एमआयएम )८९४ मते, ब) फरहाना परविन आसिम खान, अपक्ष ८४७ मते, प्रभाग क्रमांक ६,अ) सपना गणेश बजाज,(शिवसेना शिंदेगट) ५५२ मते,ब) सुधीर घोडचर भाजप ५४२ मते,प्रभाग क्रमांक ७,अ) प्रतिमा भोजने, भाजप ६६१मते, ब) विरेंद्रसिंह ठाकूर भाजप ५८२ मते, प्रभाग क्रमांक ८अ) किरणताई अशोक परळीकर, राष्ट्रवादी( अजित पवार गट) १००९ मते, ब) श्रीहरी इंगोले भाजप ७७७ मते,प्रभाग क्रमांक ९ अ) रुपाली मनोज खोडे भाजप १०७३ मते, ब) राजु नंदलाल जयस्वाल, भाजप १०२६ मते, प्रभाग क्रमांक १० अ) गणेश खोडे, भाजप १०३८ मते,ब) वैशाली संदिप हरिहर, (राष्ट्रवादी अजित पवार गट) १०८० मते,क)आशा पवार, भाजप ९१४ मते मिळवून विजयी झाले आहेत.

पक्षनिहाय सदस्यसंख्या
मंगरूळनाथ परिषद २०२५ निवडणूकीत भाजपाने १० जागा, राष्ट्रवादी ५ जागा, भारतीय काँग्रेस १, एमआयएम १ जागा, अपक्ष ३ जागा, शिवसेना १ जागी तर अध्यक्षपदी अशोक परळीकर ४४९० मतांनी विजयी झाले आहेत.
मागील निवडणुकीत भाजपाचे एकूण ७ उमेदवार निवडून आले होते यावेळी मात्र ३ उमेदवारांची अधिकच भर पडली असून या निवडीचे सर्वश्रेय आमदार श्याम खोडे व प्रा.नंदलाल पवार यांना जात असल्याचे बोलले जात आहे.