९ कोटीचा दावा... मुनव्वर फारुकींचे गंभीर आरोप, एल्विश यादव अडचणीत

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Elvish Yadav controversy भारतीय डिजिटल क्रिएटर्सच्या विश्वात सध्या एक नवी वादग्रस्त चर्चा रंगताना दिसत आहे. स्टँड-अप कॉमेडियन आणि कंटेंट क्रिएटर मुनव्वर फारुकी यांनी अप्रत्यक्षपणे युट्यूबर एल्विश यादव यांच्यावर एनजीओ स्कॅमसंदर्भात गंभीर आरोप केल्याने हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
 

Elvish Yadav controversy  
१९ डिसेंबर रोजी एल्विश यादव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब आर्थिक मदतीची विनंती करताना दिसत आहे. संबंधित कुटुंबाने त्यांच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी (SMA) हा दुर्मिळ आजार असल्याचे सांगितले असून, उपचारासाठी अमेरिकेतून मागवाव्या लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत तब्बल ९ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे एल्विश यांनी आपल्या चाहत्यांना कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही वेळातच मुनव्वर फारुकी यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणाचेही नाव न घेता असे म्हटले की, काही एनजीओ एजन्सीजच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सना भावनिक आशय असलेले कंटेंट तयार करण्यासाठी पैसे देतात, जेणेकरून अधिकाधिक डोनेशन्स गोळा करता येतील.
मुनव्वर यांनी Elvish Yadav controversy आपल्या स्टोरीमध्ये नाराजी व्यक्त करत सांगितले की, अशा प्रकारच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम देण्याची तयारी दाखवली जाते आणि हे पाहून आपल्यालाच आश्चर्य वाटल्याचे त्यांनी नमूद केले. “हे खरं असू शकतं किंवा नसेलही, पण उपचारानंतर उरलेला पैसा कुठे जातो, हा प्रश्न पडतो,” असे सूचक विधान त्यांनी केले.पुढे त्यांनी असेही म्हटले की, जर एवढ्या मोठ्या प्रमाणात क्राऊड फंडिंग होत असेल, तर त्यामागे केवळ मदतीपेक्षा व्यावसायिक हेतूही असू शकतो. भावनिक कथा सांगून लोकांकडून देणग्या गोळा करणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.जरी मुनव्वर फारुकी यांनी थेट एल्विश यादव यांचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या स्टोरीची वेळ आणि संदर्भ पाहता ही टीका एल्विश यांच्यासाठीच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर मुनव्वर यांनी अद्याप अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, तसेच एल्विश यादव यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या वादामुळे सोशल मीडियावर चर्चांना वेग आला असून, क्रिएटर्सच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.