नागपूर,
Ninad Sangeet Vidyalaya निनाद संगीत विद्यालयातर्फे हिंदी चित्रपट गीतांवर आधारित ‘सुनहरे गीत’ हा बहारदार कार्यक्रम सीताबर्डी येथील हिंदी मोरभवनमध्ये उत्साहात सादर झाला.कार्यक्रमात नीता देव यांनी सादर केलेली ‘कौन आया के निगाहों में’ आणि ‘बाहों में चले आओ’ ही गीते रसिकांच्या मनाला भावली. स्वाती जोशी यांनी गायलेली ‘अजी रूठ कर अब’ व ‘पिया तो से’ या गीतांना प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ची दाद दिली.कार्यक्रमाला विशेष शोभा आली ती तन्वी साने व रोहिणी बापट यांनी सादर केलेल्या ‘मेरे ढोलना’ या गीतामुळे. या सादरीकरणातील सरगम व ताना अत्यंत सुरेख रीतीने सादर करण्यात आल्या.
विद्यालयाच्या संचालिका रेखा साने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी आपली कला प्रभावीपणे सादर केली.Ninad Sangeet Vidyalaya साथसंगती साठी परिमल जोशी, पंकज यादव, अक्षय हरले, स्मिता देशपांडे यांनी उत्तम साथ दिली.कार्यक्रमाचे निवेदन अर्चना देशपांडे व देविका गोखले यांनी केले.
सौजन्य:अंजली पांडे,संपर्क मित्र