नितीन गडकरी यांनी भरला भाजयुमो कार्यकर्त्यात हुंकार

महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता आणा,चिटणीस पार्कमध्ये युवा हुंकार संमेलन

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Nitin Gadkari जगातले सुंदर शहर म्हणून नागपूरची ओळख बनवायची आहे. त्यासाठी महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता आणावी लागेल. मॅन टू मॅन, हाऊस ते हाऊस काम जनतेपर्यंत पोहोचवा, अशी साद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत नागपूरकर तरुणांना घातली.नागपूरच्या विकासाबाबत सांगायचे झाले तर 3-4 तास कमी पडतील. हे सर्व माझ्यामुळे झालेले नाही. तुम्हा तरुणांमुळे, जनतेमुळे झाले आहे. तुम्ही आम्हाला निवडून देऊन आमच्यात ताकद निर्माण केली. पण, आणखी काम करायचे आहे, असा हुंकारही नितीनजींनी तरुणाईत भरला.
 

Nitin Gadkari  
महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे चिटणीस पार्कमध्ये युवा हुंकार संमेलन आयोजित करण्यात आले होते. आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, भाजपाचे महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महामंत्री श्रीकांत आगलावे, बाल्या बोरकर, राम आंबुलकर, श्याम चांदेकर, संदीप जाधव, संजय बालपांडे, रितेश गावंडे, अर्चना डेहनकर, भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, रितेश पांडे, ऋषभ अरखेल आदींसह इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी आज खास शैलीत तरुणाईला साद घालत त्यांच्यात हुंकार भरला. ते म्हणाले की, भारतात उत्तम महापालिका म्हणून नागपूर महापालिका प्रस्थापित झाली. शहरात पाणी ही समस्या नाही. शहराला 750 ते 800 एमएलडी पाणी मिळते. 350 एमएलडी सांडपाणी शुद्धीकरणानंतर विकून महापालिकेला 350 कोटी मिळतात. 2400 कोटी मंजूर झाले असून नाग नदी शुद्धीकरण सुरू झाले आहे. त्यातून अंबाझरी ते आंभोरा नौका विहाराचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.तीनशे खेळांची मैदाने तयार करावयाची आहेत. नेताजी, कॉटन मार्केटसह नव्याने विविध मार्केट तयार होत आहेत. तेथे स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट तयार होतील. लंडन स्ट्रिटवर 250 कोटींची गुंतवणूक झाली असून अडीच हजार कोटी रुपये त्यातून उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. पूर्व नागपुरात ‘नाका तेथे पूल’ अशी गरज होती. एवढे पूल झाले आहेत की ‘नको आता पूल’ असे सांगायची वेळ आली आहे.
 
 
नागपुरात केलेल्या Nitin Gadkari विकासकामांची जंत्री सादर करून नितीन गडकरी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेसात लाख कोटी गुंतवणूक आणली. नागपूरच्या विकासाबाबत सांगायचे झाले तर 3-4 तास कमी पडतील. नागपूरच्या गोर-गरीब जनतेची सेवा झाली पाहिजे. नागपूरला पुन्हा गतवैभव आणायचे आहे. नागपूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. या निवडणुकीत काँग्रेसला नेस्तनाबुत करायचे आहे. कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभाग पिंजून काढावा, असे आवाहन आ. कृष्णा खोपडे यांनी केले. आ. प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, शिवानी दाणी वखरे यांचीही भाषणे झाली.तत्पूर्वी शहराच्या विविध भागातून कार्यकर्ते वाजतगाजत मिरवणुकीने आले. चिटणीस पार्क खचाखच भरले होते. विविध घोषणांनी तरुणांत देशभक्ती जागवली.
 
 
महापालिका Nitin Gadkari निडवडणुकीसाठी 5 हजार अर्ज आले आहेत. ज्या कार्यकर्त्याला जनतेचे समर्थन आहे, निष्ठावंतांना प्राधान्य देऊ, जात-पात- पंथाला थारा नाही. भाजपाचा आमदार असलेल्या मतदारसंघातील 100 टक्के नगरसेवक भाजपाचे यायला हवेत. उत्तर नागपुरात सर्वाधिक आव्हान आहे. तेथे 26 पैकी 16 ते 18 नगरसेवक, पश्चिम नागपुरात 15-20 नगरसेवक निवडून यायला हवेत. पूर्व आणि दक्षिण नागपुरात विजय कायम ठेवायचा आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.