मुंबई,
Nora Fatehi car accident अभिनेत्री व नृत्यांगना नोरा फतेही शनिवारी मुंबईत एका रस्ते अपघातात जखमी झाल्या. सनबर्न फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड गुएटाच्या कॉन्सर्टसाठी जात असताना त्यांच्या कारला नशेत वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात नोरा यांच्या डोक्याला दुखापत झाली.
घटना घडल्यानंतर तात्काळ नोरा यांच्या टीमने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी डोक्याला झालेल्या जखमेची गंभीरता तपासण्यासाठी सीटी स्कॅन केला. तपासणीनंतर अंतर्गत दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, पुढील काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, अपघात असूनही Nora Fatehi car accident नोरा फतेही यांनी आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या परवानगीनंतर त्या सनबर्न २०२५ मधील आपल्या विशेष परफॉर्मन्ससाठी रवाना झाल्या. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.उल्लेखनीय म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डीजे डेव्हिड गुएटा ‘मोनोलिथ शो’सह २० डिसेंबर रोजी भारतात परतले आहेत. आठ वर्षांनंतर भारतात येणाऱ्या गुएटाच्या शोबाबत प्रचंड उत्सुकता असून, नोरा फतेही यांच्या विशेष सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. अपघातानंतरही व्यावसायिक बांधिलकी जपत नोरा यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.