अनिल कांबळे
नागपूर,
molestation-case : एकर्ती प्रेमातून तरुणीचे अश्लील छायाचित्र इंस्टाग्रामवर व्हायरल करुन विनयभंग करणाèया युवकाला न्यायालयाने चार वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आदर्श गणपत माेहाेतकर (23 वर्ष, रा. परसाेडी ता.कळमेश्वर, जि. नागपूर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
संग्रहित फोटो
बारावीत शिकणाèया 17 वर्षीय तरुणीशी आराेपी आदर्श माेहाेतकर याची ओळख झाली. दाेघांची काही दिवसांत मैत्री झाली. दाेघांचे ाेनवर बाेलणे सुरु हाेते. मात्र, यादरम्यान आदर्श हा तिच्यावर एकर्ती प्रेम करायला लागला. त्याने तिला प्रेम करीत असल्याचे सांगताच तिने नकार दिला. त्याच्यापासून दुरावा केला. त्यामुळे ताे चिडला. तेव्हापासून आदर्श हा तरुणीचा महाविद्यालयापर्यंत पाठलाग करीत हाेता. तसेच तिच्याशी बाेलण्याचा प्रयत्न करीत हाेता. त्याने तिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्राेाईल तयार करुन त्यावर अश्लील छायाचित्र प्रकाशित केले.
त्यानंतर तिला रस्त्यात अडवून अश्लील चाळे केले. चेहèयावर अॅसिड ेकण्याची धमकी दिली.या प्रकरणी तरुणीने सावनेर पाेलिस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाअंती दाेषाराेप न्यायालयात पाठवले. न्यायालयाने कलम 354 भादंवी मध्ये 4 वर्षे सश्रम कारावास व 4000रूपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष साधा कारावास, कलम 34 1 मध्ये 1 महिना साधा कारावास व 500 रू. दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास, कलम 506 (2) मध्ये 3 वर्षे सश्रम कारावास 8 पाेक्साे मध्ये 4 वर्षे सश्रम कारावास व 5000 रू. दंड सश्रम कारावास अशी शिक्षा ठाेठावली आहे. या प्रकरणी शासनार्ते अॅड. पंकज तपासे यांनी बाजू मांडली.