भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल!

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचे वक्तव्य

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |

shirsat
 
मुंबई,
Sanjay Shirsat's statement नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात उत्सुकता पसरली आहे. मतमोजणी सुरू झाल्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, या निकालानंतर भाजप हा स्पष्टपणे एक नंबरचा पक्ष ठरेल. संजय शिरसाट यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. उबाठा आणि मामू असा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, विरोधकांचे अस्तित्व निवडणुकीत संपल्याचे दिसत आहे. तसेच, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे महत्त्व आणि निवडणुकीतील यशाबद्दल त्यांनी सविस्तर भाष्य केले. विरोधकांनी सभा न घेतल्यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. शिरसाट यांनी सांगितले की,आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी लढलो आणि त्यांच्या मतेच ही निवडणूक आम्ही गांभीर्याने घेतली होती.