ज्येष्ठ नागरिक महामंडळाची सहल

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Senior Citizens Corporation ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ तर्फे साकोली नजीक नागझिरा जंगलात एकदिवसीय जंगल सफारी सहलीचे आयोजन करण्यात आले. २२ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते, त्यात ८२ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठही होते.
 
vinod
 
 
नागपूरहून निघालेल्या या सहलीदरम्यान नागझिरा जंगलात वानरे, मोर, हरणे, काळवीट, गवा यांसह प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन घडले. निसर्गसौंदर्य, थंड वारा व शांत वातावरणाचा अनुभव घेत सहल यशस्वीरीत्या पार पडली.Senior Citizens Corporation  परतीच्या प्रवासात सामूहिक छायाचित्रण करून आनंददायी आठवणी जपत सर्वांनी निरोप घेतला.
 
सौजन्य : विनोद व्यवहारे,संपर्क मित्र