लोककल्याण समितीतर्फे सुधा कोल्हेकर यांचा गौरव

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Lokkalyan Samiti गीतानगर येथील सुधा कोल्हेकर यांनी लोककल्याण समिती यांना एक लाख रुपयांचे दान केले. या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात भाग संघ चालक डॉ. रमाकांत कापरे, ओंकार नगर संघ चालक प्रकाश बापट, अजनी भाग सेवा प्रमुख प्रकाश तांबोळी, भाग सह सेवा प्रमुख पद्माकर साठे, ओंकार नगर व्यवसायिक शाखा प्रमुख संजय भाकरे आणि गीता नगरचे स्वयंसेवक व नगर सेवा प्रमुख उपस्थित होते. सन्मानित करताना सुधा कोल्हेकर यांनी सेवा प्रशस्ती पत्रक आणि शाल देऊन गौरव करण्यात आले. लोककल्याण समिती, नागपूर या दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची मन:पूर्वक आभार व्यक्त करते.
 

Lokkalyan Samiti 
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र