नागपूर,
unauthorized-travel-without-a-ticket : तिकिटाविना अनधिकृत प्रवास करणार्यांविरोधात मध्य रेल्वेने राबविलेल्या मोहिमेंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये तब्बल २७.५१ लाख प्रकरणांमधून १६४.९१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत नागपूर विभागाचा वाटा लक्षणीय राहिला असून या विभागातून २.९२ लाख फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १८.१३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात मोहिमेदरम्यान विनातिकीट किंवा अपूर्ण तिकिटासह प्रवास करणार्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विशेषत: नोव्हेंबर २०२५ या एकाच महिन्यात ३.७४ लाख विनातिकीट पकडण्यात आले. हे प्रमाण नोव्हेंबर २०२४मधील २.९८ लाखांच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तुलनेत तब्बल ६८ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेने स्टेशन तपासणी मेगा तिकीट तपासणी मोहिमा अशा बहुआयामी उपाययोजना राबवल्या आहेत. या कारवाया मेल-एक्स्प्रेस, प्रवासी तसेच विशेष गाड्यांमध्ये सातत्याने सुरू असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.