वणी,
Wani-Municipal Council Results : वणी नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष विद्याताई खेमराज आत्राम यांच्या सह 29 नगरसेवकापैकी 18 जागा जिंकून वणी नगर परिषदेवर विजयाचा झेंडा रोवला आहे. उबाठा शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 3 व 2 अपक्ष नगर सेवक विजयी झाले आहेत. यात शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. वणी नगर परिषदेची झालेली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची होईल असे वाटले होते. पण मागील 2014 च्या निवडणुकीपासून वणीकराणी सातत्याने भाजपा च्या झोळीत आपले वजन टाकले आहे.

या निवडणुकीत पुढील प्रमाणे निकाल घोषित झाला आहे. नगर अध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी विद्या खेमराज आत्राम यांनी 15377 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी यांना उबाठा शिवसेनेचे उमेदवार संचिता विजय नगराळे यांना 10585 मते मिळाली. यांच्यासोबत पुष्पा कवडू कुळसंगे ( आम आदमी) यांना 387 मते, पायल यशवंत तोडसाम शिवसेना यांना 4351 मते, भारती संतोष पेंदोर अपक्ष यांना 272 मते, शेख काजल इस्माईल अख्तर शप रा काँग्रेस यांना 622, पुष्पाताई पुंडलिक आत्राम वंचित बहुजन आघाडी यांना 1245 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 1 अ प्रणाली गणेश देऊळकर उबाठा शिवसेना 970 विजयी, मीनाक्षी शैलेंद्र जुनघरे भाजपा 862 अजय पांडुरंग धोबे उबाठा शिवसेना 540 विजयी, बाळू महादेव जोगे भाजपा 529, प्रभाग क्रमांक 2 अ रिता महेश भाजपा 927 विजयी, ज्योत्स्ना बालाजी धोटे उबाठा शिवसेना 708 , ब धनराज रमेश भोंगळे अपक्ष 645 विजयी, आशिष ज्ञानेश्वर डंबारे भाजपा 651, प्रभाग क्रमांक 3 अ वातीले वैशाली विनोद वातीले भाजपा 951 विजयी, अश्विनी विनोद खापणे उबाठा शिवसेना 751, ब लक्ष्मण महादेव उरकुडे भाजपा 870 विजयी, अरुण अभिजीत सातोकर उबाठा शिवसेना 781 , प्रभाग क्रमांक 4 अ अर्चना संजय पुनवटकर भाजपा 1125 विजयी, मेघा सुधीर पेठकर उबाठा शिवसेना 591, ब राकेश लक्ष्मण बुगेवार भाजपा 959 विजयी, प्रवीण शेषराव ढोके उबाठा शिवसेना 733 , प्रभाग क्रमांक 5 अ सोनाली प्रशांत निमकर भाजपा 1579 विजयी, अर्चना सुभाष ताजने उबाठा शिवसेना 541, ब रितिक लक्ष्मण मामीडवार भाजपा 1141 विजयी, गौतम दिलीप जीवने उबाठा शिवसेना 559 , प्रभाग क्रमांक 6 अ करुणा रवींद्र कांबळे काँग्रेस 758 विजयी, धम्मदीन हरीश पाते भाजपा 632 , अनिकेत अनिल बनकर उबाठा शिवसेना 439 विजयी, विलास मारुती डवरे भाजपा 433 , प्रभाग क्रमांक 7 अ उषा नथू डुकरे भाजपा 676 विजयी, शेख रुकसाना परवीन शप रॉका 585, ब गोपाल नितीन गोपाल धाबेकर भाजपा 598 विजयी, सचिन अरुण पाटील उबाठा शिवसेना 490, प्रभाग क्रमांक 8 अ प्रमिला मनोज चौधरी भाजपा 761 विजयी, सारिका सिद्धमशेशेट्टीवार 499 काँग्रेस, ब सुधीर थेरे उबाठा शिवसेना 519 विजयी, राजु इंगोले शिवसेना 480, प्रभाग क्रमांक 9 अ किरण शंकर दरेकर उबाठा शिवसेना 1245 विजयी, भारती बदखल भाजपा 1061, ब अब्दुल हफिस सत्तार टापू अपक्ष 836 विजयी, शत्रुघन मारुती मालेकर उबाठा शिवसेना 610, प्रभाग क्रमांक 10 वअ आरती गिरीश वांढरे भाजपा 1221विजयी, खैरून बी कादर प्रहार जनशक्ती 575 , ब अनिल चिंडालिया भाजपा 1284 विजयी, अक्षय बोथरा शिवसेना 635, प्रभाग क्रमांक 11 अ रेखा विलास कोवे भाजपा 1185 विजयी, सोनाली नितीन आत्राम शिवसेना 535, ब लवलेश लाल भाजपा 710 विजयी, शेख मोहम्मद अल्ताफ शिवसेना 448, प्रभाग क्रमांक 12 अ पूजा रवींद्र रामगिरीवार भाजपा 821विजयी, शीला रवींद्र मेश्राम काँग्रेस 565 , ब मनोज सिडाम भाजपा 648 विजयी, आकाश उईके काँग्रेस 596, प्रभाग क्रमांक 13 अ अलका मोवाडे काँग्रेस 1193 विजयी, ललिता भेदोडकर भाजपा 1015, ब सैफुल रहमान काँग्रेस 1247 विजयी, राजेश्वर सुरेश चोपडे भाजपा 885 , प्रभाग क्रमांक 14 मनीषा राजू गव्हाणे भाजपा 1310 विजयी, माधुरी महेश साळुंखे उबाठा शिवसेना 1307, ब रंगरेज गुलाम रसूल वली ऊबाठा 1513 विजयी, दीपक मोरे अपक्ष 812, क अर्चना शंकर झिलपे भाजपा 1479 विजयी, हिना शकील अहमद शिवसेना 874 यांनी विजय उमेदवार व त्यांच्या नजिकच्या उमेदवारांना मते पडली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 अ मधील निवडणूक अतिशय अटीतटीची होऊन त्यात भाजपाच्या मनिषा गव्हाणे या केवळ 3 मतांनी विजयी झाल्या.