वर्धा,
wardha-municipal-council-election-results : जिल्हास्थान आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची गृह नगर पालिका असलेल्या वर्धा नगर पालिकेतील निवडणुकीने लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली. येथे मतदारांनी मतदानापासुन नगराध्यक्षपदासाठी पांगुळ यांच्याच नावाची चर्चा सुरू केली होती आणि काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांच्याच बाजूने निकाल लागला. लोकसभेतही मतदारांनी काळे यांच्याच नावाची चर्चा केली होती. रायगड म्हणून ओळख असलेल्या नगर पालिकेचे अध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ निवडून आले असले तरी बहुमत मात्र भारतीय जनता पार्टीला मिळाले असल्याने पांगुळ यांनी रायगड केला सर; बहुमताची चाबी भाजपाजवळ असेच काहीसे म्हणावे लागेल.

वर्धेत भारतीय जनता पार्टीने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात स्वतंत्र निवडणूक लढवली. तर राकाँ आणि शिवसेना यांनी आपले वेगळे उमेदवार उभे केले होते. आजच्या निकालात पांगुळ यांनी भाजपाचे नगराध्यपदाचे उमेदवार निलेश किटे यांचा ७ हजार १३६ मतांनी पराभव केला. मतदानापासुन काही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्षदाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांच्या नावाची हवा तयार झाली होती. परंतु, ती आज केवळ हवाच ठरली. मतमोजणी झाल्यानंतर सायंकाळी शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यात उघड्या वाहनात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, नेते शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे आदी उपस्थित होते.
वर्धेत प्रभाग १ मधून भाजपाचे सतीश मिसाळ ः १०७६, उज्वला पेठे ः ८८१, प्रभाग २ भाजपाचे विजय उईके ११२९, काँग्रेस शेख नाजिया शेख मेहमूद ७५५, प्रभाग ३ भाजपाचे सचिन होले ८५२, सोनल त्रिवेदी १३६२, प्रभाग ४ भाजपाचे वंदना चामटकर ७०३, शपगटाचे सोहनसिंग ठाकूर ९३९, प्रभाग ५ भाजपाच्या निशा गोसावी ९४६, विलास आगे ९०७, प्रभाग ६ शपगटाचे प्रदीप जग्यासी १२१०, भाजपाचे शेख तरन्नुम शेख ८२६, प्रभाग ७ शप गटाचे शैलेंद्र झाडे ६६२, श्वेता पाठक ६४२, प्रभाग ८ भाजपाच्या वैष्णवी मेघे १०२९, प्रफुल्ल शर्मा १०३५, प्रभाग ९ भाजपाच्या शुभांगी कोलते १४५१, प्रदीपसिंग ठाकूर ११२७, प्रभाग १० भाजपाचे वंदना भुते १२९७, पवन राऊत ९३४, प्रभाग ११ भाजपा स्वाती गव्हाणे १२७१, प्रदीप तलमले १२९३, प्रभाग १२ मोहीनी आडे १३७५, अभिषेक त्रिवेदी १५५९, प्रभाग १३ भाकप यशवंत झाडे ११६१, शपगटाच्या दीपिका आडेपवार ६३४, प्रभाग १४ राष्ट्रवादी काँग्रेस संतोष ठाकूर १२९१,
स्नेहा आकरे ११०६, प्रभाग १५ भाजपाचे सुनील चावरे ११७०, प्रियंका खंगार १०३६, प्रभाग १६ भाजपाच्या सोनाली तडसे १०५३, अपक्ष सुरेश आहुजा १०२९, प्रभाग १७ अपक्ष जयश्री आगरकर ८६९, भाजपाच्या राखी पांडे ९६२, प्रभाग १८ काँग्रेसच्या अश्विनी खोडे ९१८, नदीम सत्तार ९०६, प्रभाग १९ काँग्रेसच्या अर्चना सोमवंशी १९८६, परवेज खान २४५८, प्रभाग २० भाजपाचे कैलास राखडे ८०८ आणि मेघना त्रिमले ८८८ मतांनी विजयी झाल्या.
श्रेया देशमुख यांचा पराभर जिव्हारी
जातीपातीचे राजकरण असलेल्या वर्धेत श्रेया श्रीधर देशमुख यांना भाजपाने प्रभाग ७ मधून उमेदवारी दिली होती. येथे भाजपातून तिकीट न मिळालेले भाजपाचे वरुण पाठक यांनी पत्नीला शरद पवार गटातून उमेदवारी मिळवून दिली. श्रेया देशमुख या गेल्या पंचवार्षिकमध्ये शिक्षण सभापती होत्या. त्यांनी नगर पालिका शाळांमध्ये सुधारणा केल्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सेलू तालुयात खिंड लढवली होती. उमेदवारी आणि नंतर आता पराभव हा दिवसभर चर्चेचा विषय होता.
वर्धेतील नगराध्यपदाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेले मतं
नीलेश किटे ः १६३२४
स्कर्मिश खडसे ः ९९६
नितीन जुमडे ः २०५
संतोष ठाकूर ः ३०४०
सुधीर पांगूळ ः २३४६०
रविकांत बालपांडे ः ६०७०
प्रमोद भोमले ः १५४
सुनील शामडीवाल १००
नोटा ः २७१
जिल्ह्यातील ६ नगर पालिकांमधील पक्षीय बलाबल
वर्धा नगर परिषद
भाजपा : २५
काँग्रेस : ०५
श.प.गट : ०५
राष्ट्रवादी काँग्रेस : ०२
भाकप (मार्सवादी) : ०१
अपक्ष : ०२
एकूण : ४० जागा
अध्यक्ष - काँग्रेस
...................
हिंगणघाट नगर परिषद
भाजपा : २७
राष्ट्रवादी काँग्रेस : ०५
श. प. गट : ०२
उबाठा : ०२
अपक्ष : ०४
काँग्रेस : ००
एकूण ४० जागा
अध्यक्ष - भाजप
....................
आर्वी नगर परिषद
भाजपा : १४
श. प. गट : ०७
काँग्रेस : ०२
राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
शिवसेना (उबाठा) : ०१
एकूण २५ जागा
अध्यक्ष - भाजप
................
देवळी नगर परिषद
भाजपा : १६
काँग्रेस : ०४
एकूण - २० जागा
अध्यक्ष - अपक्ष
................
पुलगाव नगर परिषद
काँग्रेस - १०
भाजपा - ०८
अपक्ष : ०३
एकूण जागा - २१
अध्यक्ष - काँग्रेस
...............
सिंदी (रेल्वे) नगर परिषद
भाजपा : १०
श.प.गट : ०५
काँग्रेस : ०४
अपक्ष : ०१
एकूण - २०
अध्यक्ष - भाजप
........................