तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
municipal-council-election-results : यवतमाळ नगर परिषदसह वणी, पांढरकवडा नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आली असून, यवतमाळ नगर परिषदेत भाजपाच्या अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके, पांढरकवडा अतिष बोरले, वणी विद्या आत्राम यांचा विजय झाला आहे. पुन्हा एकदा यवतमाळ नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे. मतदान मोजणीदरम्यान काँग्रेसच्या नगर परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियंका मोघे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. तर यवतमाळ नगर परिषदेत वंचितसह बसपा व अपक्षांनीसुद्धा आपले खाते उघडले.
यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष आणि 58 नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली. यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे श्रीकृष्ण कांबळे, काँग्रेसच्या वनिता बडे विजयी झाल्या. प्रभाग 2 मध्ये काँग्रेसच्या सविता चव्हाण, वंचित आनंद गायकवाड, प्रभाग 3 मध्ये भाजपाच्या मीना मसराम, भाजपाच्या अश्विन बोपचे विजयी झाल्या. प्रभाग 4 भाजपाच्या साधना काळे, शिंदे शिवसेना पिंटू बांगर विजयी झाले आहेत. प्रभाग 5 मध्ये शिवसेनेचा आकाश परतेकी, शिवसेनेच्या शोभा साबळे, प्रभाग 6 मध्ये काँग्रेसच्या वैशाली सवाई, काँग्रेसच्या विशाल पावडे, प्रभाग 7 मध्ये काँग्रेसच्या करुणा तेलंग, भाजपाच्या श्रद्धा भडके, प्रभाग 8 मध्ये भाजपाच्या लता ठोंबरे, भाजपा किरण प्रजापती, प्रभाग 9 शिवसेना चैताली बेलोकार, शिवसेना पूजा गायकी, प्रभाग 10 वंचित मिरा वीर, वंचित नीरज वाघमारे, प्रभाग 11 भाजपा स्वाती खंडारे, भाजपा देविदास अराठे, प्रभाग 12 भाजपा विजय राय, भाजपाच्या मनीषा भावे, प्रभाग 13 भाजपा सुभाष राय, भाजपा शोभा हर्षे, प्रभाग 14 काँग्रेस साधना शंभरकर, बीएसपी विपुल खोब्रागडे, प्रभाग 15 कॉग्रेस मो शाहीन मतीन परवीन, काँग्रेस मो शाकीर मो नजीब, प्रभाग 16 काँग्रेस जावेद अन्सारी, एमआयएम शे अंजुम परवीन, प्रभाग 17 काँग्रेस शाह तबस्सूम, अपक्ष भारत ब्राम्हणकर, प्रभाग 18 काँग्रेस अनूप नैताम, काँग्रेस अमृता तिवारी, प्रभाग 19 भाजपा मुन्ना दुबे, भाजपा सोनाली तिडके, प्रभाग 20 भाजपा माया शेरे, भाजपाचे दत्ता कुळकर्णी, प्रभाग 21 भाजपाचे चंदू चौधरी, शिवसेनेच्या सपना उपगनलावार, प्रभाग 22 भाजपा प्रियंका भवरे, भाजपा नितीन गिरी, प्रभाग 23 काँग्रेस प्रमोद बगाडे, भाजपाच्या संगीता बोबडे, प्रभाग 24 भाजपाच्या शैला मिर्झापुरे, भाजपाच्या भास्कर केळापुरे, प्रभाग 25 काँग्रेसच्या वैशाली उईके, काँग्रेसच्या सपना लंगोटे, प्रभाग 26 भाजपाचे दिलीप काळे, भाजपाच्या कीर्ती राऊत, प्रभाग 27 भाजपाच्या रिता धावतोडे, भाजपा पंकज देशमुख, प्रभाग 28 भाजपा अर्चना चिंडाले, शिवसेना लोकेश इंगोले, प्रभाग 29 प्रहारच्या सोनाली मडावी, प्रहारचे बिपीन चौधरी विजयी झाले आहेत.
यवतमाळ जिल्हा नप निवडणूक मतमोजणी :
-------------------------------------------------
फेरी अॅड.प्रियदर्शनी उईके तेजस्विनी चांदेकर प्रियंका मोघे
-------------------------------------------------
1 2376 542 1811
2 898 155 2141
3 2257 540 566
4 1979 957 761
5 2185 820 625
6 2185 296 1571
7 2200 788 1120
8 3012 968 2022
9 1013 1527 1337
10 1271 385 1586
11 1537 579 832
12 1944 225 563
13 2467 231 1861
14 1197 93 2332
15 443 280 4320
16 1043 366 4180
17 2680 214 2758
18 1744 382 1359
19 2117 61 1232
20 2426 133 942
21 2327 547 709
22 2618 999 968
23 1635 241 1221
24 2445 525 1440
25 2258 375 1965
26 2340 195 1025
27 2463 779 971
28 1868 791 1348
29 2292 446 1141
-------------------------------------------------
एकूण - 57713 14521 44994
-------------------------------------------------