नवी दिल्ली,
Air India emergency landing, दिल्लीवरून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय ८८७ क्रू फ्लाइटला सोमवारी सकाळी टेक ऑफनंतर काही मिनिटांतच आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग साइट्सनुसार, सकाळी ६:१० वाजता हे बोईंग विमान दिल्लीहून मुंबईसाठी उड्डाण करत होते. मात्र, काही वेळानंतर विमानाच्या एका इंजिनमध्ये ऑईल प्रेशर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळले. काही क्षणांतच हा ऑईल प्रेशर शून्यावर पोहोचला. खबरदारी म्हणून विमानाला लगेचच दिल्लीकडे वळवण्यात आले आणि विमानतळावर सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “२२ डिसेंबर रोजी दिल्लीवरून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइट एआय ८८७ च्या क्रू सदस्याने तांत्रिक बिघाड लक्षात घेतल्यावर उड्डाणानंतर लगेचच विमान दिल्लीकडे परतण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. या अनपेक्षित परिस्थितीमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे.”
ही घटना दोन इंजिन Air India emergency landing, असलेल्या विमानावर घडली असून, एका इंजिनावर देखील विमान सुरक्षितपणे उतरू शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात टळला. विमानाची आवश्यक तपासणी सुरू असून, दिल्लीतील एअर इंडियाच्या टीमने प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे.एअर इंडियाच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, “आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा व कल्याण ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”