नागभीड,
12-foot python rescued Nagbhid देलनवाडी गावातील प्रशांत कामडी यांच्या घरालगतच्या परसबागेत बारा फूट लांबीच्या व तेरा किलो वजनाच्या अजगराचा स्वाब बचाव दलाने सुरक्षित बचाव करून जंगलात जोडले.
देलनवाडी गावातील प्रशांत कामडी यांच्या घरालगत परसबागेत एक मोठा साप निदर्शनास आला. या बाबतची माहिती स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जिवेस सयाम यांना देण्यात आली. माहिती मिळताच जिवेश सयाम, आदित्य नान्हे यांनी अजगराला पकडले व गावकर्यांना अजगराबद्दलची माहिती दिली. गावालगत पहाडी परिसर आणि जंगल असल्याने हा साप गावात आला आणि अजगर साप हा घोणस प्रमाणे दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात. यामुळे या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता अजगर हा संरक्षित प्राणी असून, तो ‘शेड्युल वन’ मध्ये येत असल्याने त्याला वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे अजगराला मारणे चुकीचे आहे. तो अत्यंत कमी संख्येत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर वनविभागाला किंवा आम्हाला कळवा, असे गावकर्यांना सयाम यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या दिवसात घरामध्ये साप घुसण्याच्या घटना या मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे घर किंवा परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये व त्या सापाला मारण्याऐवजी सर्पमित्रांनाच पाचारण करावे. सर्प दंश झाल्यास कोणत्याही मांत्रिकाकडे न जाता शासकीय रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावा, असे स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी सांगितले. या अजगराची नोंद तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात करून गायमुख जंगलात एका सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक पंडित मेकेवाड, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे,