बुलढाणा,
census 2026-buldhana जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने डिजिटल जनगणना व घर यादी गट यादी तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरावर सहायक संचालक प्रविण भगत व सांख्यिकी अन्वेषणचे अरुण साळगांवकर यांची बुलढाणा जिल्ह्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दि. २२ डिसेंबर रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे प्रशिक्षण पार पडले.

census 2026-buldhana या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा चार्ज अधिकारी (ग्रामीण), त्यांचे जनगणना संबंधित नायब तहसीलदार, लिपीक, मंडळ अधिकारी, तसेच सर्व मुख्याधिकारी व चार्ज अधिकारी (शहरी), त्यांचे जनगणना संबंधित अधिकारी-कर्मचारी, सहाय्यक संचालक नगर रचना, बुलढाणा आणि सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
census 2026-buldhana त्यानंतर सहाय्यक संचालक प्रविण भगत व सांख्यिकी निरीक्षक अरुण साळगांवकर यांनी डिजिटल जनगणना, घर यादी गट यादी निर्मिती, कामकाजाची पद्धत, जबाबदार्या व नियोजन याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थित अधिकार्यांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेऊन त्यावर तात्काळ मार्गदर्शन व निराकरण करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे जनगणना २०२७ ची पूर्वतयारी अधिक सक्षम, नियोजनबद्ध व डिजिटल स्वरूपात राबविण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.