आदिवासी विविध कार्यकारी संस्थेतून जिल्हा बँकेवर धर्मेंद्र जळगावकर

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
Dharmendra Jalgaonkar, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या 18 नोव्हेंबरच्या पत्रानुसार सावरगाव गोरे आदिवासी संस्थेची सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून धर्मेंद्र नारायण जळगावकर यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.
 

Dharmendra Jalgaonkar 
संस्थेची सभा तालुका देखरेख संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोसायटी अध्यक्षांच्या मार्गदर्शनात विषयावर चर्चा व निर्णय घेण्यात आले. यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 2025-26 या पाच वर्षांकरिता संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवार सूचक अनुमोदक होण्यासाठी प्रतिनिधीत्व अधिकार देण्यात आले. धर्मेंद्र जळगावकर हे संस्थेचे नियमीत कर्जदार व सभासद असून त्यांची निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
या सभेला विठ्ठल राठोड, प्रेमसिंग राठोड, विठ्ठल घाटे, किसान आढाव, भगवान आढाव, काशीराम किरोळे, विनोद गोरे, प्रल्हाद डोंगरे, सेवा आडे, धानेश्वर टारफे उपस्थित होते. जळगावकारांनी आपल्या निवडीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि मोहिनी नाईक यांना दिले आहे.