अमरावती,
fire-wood-market-amravati येथील इतवारा परिसरातल्या लाकूड बाजाराला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीत ९ दुकाने जळून खाक झाली असून सुमारे ११ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. लाकडू बाजारातल्या दुकानला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला पहाटे ४.२५ वाजता मिळाली. लगेच पथकाने धाव घेतली. तोपर्यंत आगीने विक्राळरूप धारण केले होते. आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशांत नगर व ट्रान्सपोर्ट नगरातल्या अग्निशमन उपक्रेंद्रावरचे कर्मचारी व वाहने बोलविण्यात आली.
आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमनचे कर्मचारी
fire-wood-market-amravati या सर्वांनी आग विझविण्यासाठी जोरात प्रयत्न केले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत कादर फर्निचर, अमन फर्निचर, बाबूला फर्निचर, जमिल फर्निचर, अजिज फर्निचर, मटू शिशिवाले, वकील इलेक्ट्रीकवाले, सलमान इलेक्ट्रीकवाले, शेख फर्निचर अशी ९ दुकाने जळाली. सर्व मिळून १८ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. या आगीत दुकानातले तयार फर्निचर व साहित्य, इलेक्ट्रीकलच्या वस्तू जळून खाक झाल्या आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
fire-wood-market-amravati आगीच्या कारणाचा शोध घेतल्या जात आहे. ही घटना लवकर लक्षात आल्यामुळे मोठी वित्तहानी टळली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नितीन इंगोले, निलेश देवकर, गौरव फुके, शेख तौसिफ, श्याम भोपाळे, रोशन आलुडे, विक्की हिवराळे, निशांत राठोड, राजू शेंडे, राजेश लळे, गणेश राठोड, विलास शिरभाते, सागर माकोडे धिरज गुल्हाने, नितीन लक्कसवार यांचा समावेश आहे.