गोंदिया,
gondia-nota-tiroda-election जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा नगर परिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगर पंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना तब्बल ३५३१ मतदारांना ‘नोटा’ मतदान करून नाकारल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. जोपर्यंत देशात ‘नोटा’ची व्यवस्था नव्हती, तेव्हा मतदार मतदानासाठी जात नव्हते. अशा स्थितीत लोकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागत होते. gondia-nota-tiroda-election त्यामुळे मतदारांची मते वाया जात होती. यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया आणि राजकारणात सुसूत्रता राखता यावी म्हणून ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली. २०१३ मध्ये न्यायालयाने मतदारांना ‘नोटा’चा पर्याय देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, भारतीय निवडणूक आयोगाने डिसेंबर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये ‘नोटा’ या बटणाचा पर्याय उपलब्ध करून दिला.
(संग्रहित)
gondia-nota-tiroda-election मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीखाली ‘नोटा’चा पर्याय दिलेला असतो. वरीलपैकी एकही उमेदवार योग्य वाटला नसल्यास या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवत येते. मतमोजणी करताना ‘नोटा’वर टाकलेले मत देखील मोजले जात असून ‘नोटा’मध्ये किती लोकांनी मतदान केले याचेही मूल्यमापन केले जाते. यातून किती टक्के मतदारांना कोणताही उमेदवार नको आहे, अशी आकडेवारी समोर येते. gondia-nota-tiroda-election जिल्ह्यात नुकत्याच पार पडल्या गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व गोरेगाव, सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल ३५३१ मतदारांनी ‘नोटा’ पर्यायाचा वापर करीत रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे. यात गोंदिया नगरपरिषदेत २९५१ मतदारांनी, तिरोडा नगर परिषदेत ४४१, गोरेगाव नगर पंचायतीत ७१ व सालेकसा नगर पंचायतीत ६८ मतदारांनी ‘नोटा’ पर्यायाचा वापर करून एकही उमेदवार पसंत नसल्याचे मत दिले. विशेष म्हणजे, नगर परिषद क्षेत्रातील मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. त्याप्रमाणात नगरपंचायत क्षेत्रात नोटाचा अत्यंत वापर कमी प्रमाणात झाला आहे.
९४८ मतदारांनी नगराध्यक्ष उमेदवाराला नापसंती
gondia-nota-tiroda-election जिल्ह्यातील चार स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. ९४८ मतदारांनी रिंगणातील अध्यक्षपदासाठी असलेल्या उमेदवारांना ‘नोटा’ पर्याय वापरून मतदान केले. यात गोंदिया नगर परिषदेतील ७७८ मतदार, तिरोडा नगर परिषदेत १०७, गोरेगाव नगर पंचायतीत ३८ व सालेकसा नगर पंचायतीतील २५ मतदारांचा समावेश आहे.