जम्मू,
fake rifle telescope जम्मूमधील सिध्रा परिसरातून एका सहा वर्षीय बालकाला चिनी बनावटीचे रायफल टेलिस्कोप सापडल्याची घटना घडली आहे. हा टेलिस्कोप राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या कार्यालयाजवळ सापडल्याने पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले आहेत.
जम्मू जिल्हा पोलीसांनी याबाबत सांगितले की, स्थानिक पोलीस तसेच स्पेशल ऑपरेशन ग्रुपने या प्रकरणाचा त्वरित तपास सुरु केला आहे. “लोकांनी भयभीत होण्याचे कारण नाही,” असे पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. टेलिस्कोप जप्त झालेल्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाचे बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांमध्ये सखोल तपासणी सुरू आहे.सापडलेला रायफल टेलिस्कोप ‘स्नायपर रायफल’साठी वापरण्यायोग्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच परिसरात एनआयएचे कार्यालय, जम्मू-काश्मीर पोलीसांचे मुख्यालय तसेच सीआरपीएफ व बीएसएफ बटालियनचे मुख्यालय असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, fake rifle telescope भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या असलेल्या दाट धुक्याचा दहशतवादी संघटनांकडून घुसखोरीसाठी फायदा होऊ शकतो, असा धोका लक्षात घेऊन सीमावर्ती भागात चौकशी आणि शोधमोहीम सुरु आहे. जम्मू, सांबा, कठुआ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये सीमा भागात भारतीय पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मागील चार दिवसांपासून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत शोधमोहीम हाती घेतली आहे. वरिष्ठ बीएसएफ अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, पाकिस्तानच्या सीमेजवळ भारतीय सीमेकडे लक्ष ठेवत ७२ दहशतवादी तळ उभारण्यात आले आहेत.सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात सापडलेला रायफल टेलिस्कोप आणि त्याचा उपयोग दहशतवाद्यांकडून होऊ शकतो, या धोका लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर पोलीस व सुरक्षा दलाचे अधिकारी सापडलेल्या ठिकाणी तपासणी करत आहेत.