मदभुषी मदन गोपाल यांच्याकडे आयआयएसईआर पुणेच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपद

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Madbhushi Madan Gopal इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर), पुणे यांचे अभ्यागत या नात्याने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवृत्त आयएएस मदभुषी मदन गोपाल यांची आयआयएसईआर पुणेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
 
Madbhushi Madan Gopal, IISER Pune,
 
मदभुषी मदन गोपाल सध्या विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), नागपूरच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्याकडे ही जबाबदारी तात्काळ प्रभावाने देण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा नियमित अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत लागू राहणार आहे. प्रशासनिक अनुभव आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील सखोल कार्याचा ठसा असलेल्या मदभुषी मदन गोपाल यांच्या नेतृत्वाखाली आयआयएसईआर पुणेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यात सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही नियुक्ती देशातील अग्रगण्य वैज्ञानिक व संशोधन संस्थांच्या सक्षम व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.