“पाकिस्तानला अल्लाहने वाचवले,” ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पराभव मान्य

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद,  
operation-sindoor पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीरने असा दावा केला आहे की मे महिन्यात भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान देशाला "अल्लाहची मदत" मिळाली. त्यांनी सांगितले की ही मदत भारतीय हल्ल्यांनंतर झालेल्या भीषण लढाईच्या दिवसांत जाणवली. इस्लामाबादमधील राष्ट्रीय उलेमा परिषदेला संबोधित करताना मुनीर म्हणाला की, ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानला "आध्यात्मिक मदत" मिळाली.
 
operation-sindoor
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात आले होते, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करणे होता. रविवारी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या मुनीरच्या भाषणाच्या क्लिपनुसार, "आम्हाला ती आध्यात्मिक मदत जाणवली," असे मुनीर म्हणाला. ऑपरेशन सिंदूर हा तो काळ होता ज्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये भयंकर संघर्ष झाले. आपल्या भाषणात, असीम मुनीरने आजच्या पाकिस्तान आणि १४०० वर्षांपूर्वी अरब प्रदेशात पैगंबराने स्थापन केलेल्या इस्लामिक राज्याची तुलना केली. operation-sindoor त्यानी कुराणातील अनेक आयती आणि इस्लामिक जगात पाकिस्तानचा विशेष दर्जा म्हणून वर्णन केलेल्या गोष्टींचा उल्लेख केला. मुस्लिम जगताचा उल्लेख करताना मुनीर म्हणाले की जगभरात ५७ इस्लामिक देश आहेत, परंतु त्यानी असा दावा केला की पाकिस्तानला अल्लाहने एक अद्वितीय विशेषाधिकार दिला आहे. मक्का आणि मदिनाचा उल्लेख करताना ते म्हणाले, "त्यापैकी अल्लाहने आपल्याला हरमैन शरीफैनचे रक्षणकर्ता होण्याचा मान दिला आहे."
मुनीरने पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील सुरक्षा चिंतेचाही उल्लेख केला. operation-sindoor मुनीर म्हणाला की अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यापैकी एक निवडावे. त्यानी आरोप केला की पाकिस्तानात घुसखोरी करणारे बहुतेक दहशतवादी अफगाण नागरिक आहेत. "पाकिस्तानात येणारे ७० टक्के टीटीपी कार्यकर्ते अफगाण आहेत," मुनीर म्हणाला. त्यानी असेही म्हटले की इस्लामिक राज्यात फक्त राज्यालाच जिहाद घोषित करण्याचा अधिकार आहे.