गोंदिया,
railway-gondia-flyover जिल्ह्यातील तिरोडा ते काचेवानी तसेच देवलगाव ते अर्जुनी मोरगाव दरम्यान असलेल्या रेल्वे फाटकांवर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हे रेल्वेफाटक २४ व २६ डिसेंबर रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात येत असून उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. railway-gondia-flyover नागपूर-रायपूर रेल्वेमार्गावरील तिरोडा ते काचेवानी दरम्यान असलेल्या रेल्वेफाटकामुळे या मार्गावरील वाहतुकीचा दर १० ते १५ मिनिटांनी खोळंबा व्हायचा. तसेच गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गावरील देवलगाव ते अर्जुनी मोरगाव दरम्यानच्या रेल्वेफाटकामुळेही वाहतुकीचा खोळंबा व्हायचा.
देवलगाव-अर्जुनी रेल्वेफाटकावर लावलेला सूचना फलक
railway-gondia-flyover तसेच, काही वाहनधारक व पादचार्यांद्वारे रेल्वेफाटक बंद असतानाही ओलांडला जायचा. यात अपघाताची शक्यता नेहमीच बळावलेली राहायची. सुरक्षीत रस्ते वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच प्रवासी व मालवाहतूक रेल्वे परिचलन सुरळीत व्हावे, यासाठी या दोन्ही रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. railway-gondia-flyover दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या संमतीने तसेच समक्ष प्राधिकरणाच्या स्विकृतीने तिरोडा-काचेवानी रेल्वेफाटक २६ डिसेंबरपासून तर देवलगाव-अर्जुनी रेल्वेफाटक २४ डिसेंबरपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक नवीन उड्डाणपुलावरून सुरू करण्यात येणार आहे.