डीपीएस लावा येथे ‘प्रतिस्वरा' क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
नागपूर,
pratiswara sports festival दिल्ली पब्लिक स्कूल, लावा, नागपूर येथे नुकताच चौथा द्विवार्षिक क्रीडा महोत्सव ‘प्रतिस्वरा २०२५’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. सर्व इयत्तांतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव क्रीडा भावना, सर्जनशीलता, नाविन्य आणि सांघिक कार्याचा प्रेरणादायी संगम ठरला.
 
 

DPS 
 
 
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक व्यवसाय नेते व उद्योजक समीर बेंद्रे, तर सन्माननीय पाहुणे म्हणून सोलर एक्सप्लोकेम लिमिटेड व सोलर एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजय सिंह उपस्थित होते. शाळेचे विश्वस्त गौरव अग्रवाल, आकांक्षा अग्रवाल, डीपीएस लावाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा सागदेव आणि डीपीएस नाशिकचे प्रतिष्ठित पाहुणे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. डॉ. अनुपमा सागदेव यांनी खेळातून लवचिकता, नेतृत्व, शिस्त, संघभावना व सर्वांगीण विकास घडतो, असे नमूद केले. त्यानंतर शपथग्रहण, मानवंदना पथकाची पाहणी आणि करेज, हार्मनी, सर्व्हिस व विझडम या चारही हाऊसचे शिस्तबद्ध संचलन झाले. शांतता व चिकाटीचे प्रतीक असलेल्या मशाल रिलेने उपस्थितांची मने जिंकली. शाळेचा भविष्यवेधी रोबोटिक शुभंकर ‘लाव्हॅट्रॉन’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. टायट्रेशन, रोबोटिक्स, भ्रम व अंतराळ संशोधन अशा वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित कवायती व सादरीकरणे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवणारी ठरली.pratiswara sports festival पूर्व-प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक विद्यार्थ्यांनी विविध शर्यती, रिले व ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात झालेल्या उंच उडी, लांब उडी, गोळाफेक व थाळीफेक स्पर्धांतील खेळाडूंचे विशेष कौतुक करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभात विविध गटांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. मार्च पास्ट, ड्रिल, सीसीए व क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम हाऊस तसेच २०२५-२६ चे सर्वसाधारण विजेते जाहीर करण्यात आले. राष्ट्रगीत व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘प्रतिस्वरा’ने उत्कृष्टतेच्या शोधात चिकाटीचे स्मरणीय उदाहरण ठेवले.