वर्धा,
wardha-homeopathy होमिओपॅथी डॉक्टरांनी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण घेवाण आणि (research) संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन (bulgaria) बलगेरिया (सोफिया) येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. डोरा पाचोव्हा यांनी केले. होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ वर्धाच्या वतीने २१ रोजी होमिओपॅथी भवन, सालोड (हिरापूर) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. wardha-homeopathy युरोपमधील होमिओपॅथीची सद्य:स्थिती व भारतीय होमिओपॅथीसाठी शिकवण हा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. याचवेळी (rural women health) ग्रामीण महिला आरोग्य होमिओपॅथी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
wardha-homeopathy कार्यक्रमाची सुरूवात वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर ईशा गाढवकर या ९ वर्षाच्या चिमुकलीने सादर केलेल्या पारंपरिक गणेश वंदनेने उपस्थितांची मने जिंकली. संचालन डॉ. शुभांगी निमकर तर प्रास्ताविक डॉ. अनिल लोणारे यांनी केले. यावेळी डॉ. डोरा पाचोव्हा यांनी युरोपमधील होमिओपॅथीची सद्यस्थिती स्पष्ट करत सर्व होमिओपॅथी डॉटरांनी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण घेवाण करावी व संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे मत व्यत केले. wardha-homeopathy अध्यक्षीय भाषण डॉ. मनीष देशमुख यांनी केले, तर डॉ. दत्ता कुंभारे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. आनंद गाढवकर यांनी संचालन केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत खातदेव यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. सुचित्रा कुर्वे, डॉ. रेणुका गाढवकर, डॉ. निखील ताल्हन, डॉ. सम्राट तोटे, डॉ. अभिनव लोणारे, डॉ. मिलिंद वासेकर, डॉ. अमृता चौधरी, डॉ. शिवानी जुडे तसेच होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ वर्धाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.