पहिल्या दिवशी १०२६ अर्जांची उचल

अमरावती महापालिका निवडणूक

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
अमरावती,
municipal-corporation-election : महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी विक्रमी १०२६ नामांकन अर्जाची उचल केली. अर्ज कोणीच दाखल केला नाही. प्रतिसाद पाहता यंदा उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
 
amt
 
अर्ज उचल व दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी मनपा प्रशासनाने ७ झोन कार्यालय तयार केले आहे. त्या झोन अंतर्गत येर्‍या प्रभागातल्या उमेदवारांना सदर कार्यालयातूनच अर्जाची उचल करून तो दाखल करायचा आहे. त्यानुसार मंगळवारपासून अर्जाची उचल सुरू झाली. पहिल्या दिवशी झोन १ कार्यलयातून १६९, झोन २ कार्यालयातून १४३, झोन ३ कार्यालयातून ११५, झोन ४ कार्यालयातून १७४, झोन ५ कार्यालयातून १०३, झोन ६ कार्यालयातून ८६, सर्वात जास्त झोन ७ कार्यालयातून २३६ अशी एकूण १०२६ अर्जाची उचल झाली. कोणत्याच इच्छुकाने अर्ज दाखल केला नाही. बुधवारपासून अर्ज दाखल होऊ शकतात.
 
 
//आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा
 
 
मनपा सार्वत्रिक निवडणू पारदर्शक व्हावी, यासाठी मंगळवार २३ डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांस्कृतिक भवन व आयटीआय कॉलेजची पाहणी केली. सांस्कृतिक भवनात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहे. आयटीआय कॉलेज येथे निवडणूक प्रशिक्षण होणार आहे. यंत्रण ठेवण्याच्या स्टोअरमधील सुरक्षितता, उपकरणांची योग्य साठवण व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, प्रवेश नियंत्रण आणि यंत्रांची तपासणी केली. सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. मतदान प्रक्रियेत यंत्रांची अचूकता आणि सुरक्षितता ही पारदर्शक निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, जनसंपर्क अधिकारी भूषण पूसतकर, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता राजेश आगरकर, सुधीर गोटे उपस्थित होते.