भारत विद्यालयाचे श्रीकांत आवारी संगीत वाद्य वादन स्पर्धेत राज्यस्तरावर

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट, 
shrikant-awari : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर्फे २० रोजी आयोजित शिक्षक अधिकारी व कर्मचारी नागपूर विभागस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले होते. यात संगीत वाद्य वादन स्पर्धा- वाद्य तबला यात येथील भारत विद्यालयातील तबला शिक्षक श्रीकांत आवारी यांनी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
 
 
kl
 
राज्यस्तरीय स्पर्धा सांगली येथे होणार असून त्यांना पुढील स्पर्धेकरिता प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीचे सदस्य गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, सचिव रमेश धारकर, सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षक निलाक्षी बुरीले, पर्यवेक्षक मनीषा कोंडावार आदींनी शुभेच्छा दिल्या.