गुरुवारी दीनदयालच्या विवेकानंद छात्रावासाचा पालक मेळावा

कांचन गडकरी येणार

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Kanchan Gadkari : पारधी व शेतकरी विकासासाठी कार्यरत दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या विवेकानंद छात्रावासाचा पालक मेळावा गुरुवार, 25 डिसेंबरला दुपारी 4 वाजता यवतमाळात आयोजिला आहे.
 
 
 
kanachantai
 
 
 
पारधी बांधवांना विकासाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी 1997 पासून शिक्षा, स्वास्थ्य, संस्कार व स्वावलंबन या चतु:सूत्रीवर विवेकानंद छात्रावास चालवला जातो. त्यातून आजवर साडेपाचशेहून अधिक विद्यार्थी शिकून विविध क्षेत्रात व्यवसाय करीत आहेत. या छात्रावासाचा पालक मेळावा येथील जांब रोडवरील विवेकानंद छात्रावासात आयोजित करण्यात आला आहे. त्यास मुख्य अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष कांचन गडकरी तर अध्यक्ष म्हणून रेमंड युको डेनिमचे संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित राहणार आहेत.
 
 
या कार्यक्रमास यवतमाळकर नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारधी व शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहित करावे, असे आवाहन विवेकानंद छात्रावास संचालन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.