वर्धा,
rajesh-bakane : वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागाला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच देवळीचे- आ. राजेश बकाने यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत आग लागलेल्या बालरुग्ण विभागाची पाहणी करत रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. तसेच उपचार व्यवस्थेबाबत समाधान व्यत करत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी आ. बकाने यांनी आगीचे नेमके कारण, नुकसानाची माहिती तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था व आपत्कालीन नियोजन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी आरोग्य सह संचालक डॉ. शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, वर्धा उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी होते.
दरम्यान, आग आटोयात आणल्यानंतर बालरुग्ण विभागातील परिस्थिती नियंत्रणात असून रुग्णांवर नियमित उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.