मुंबई,
Govinda's incarnation 3 जेम्स कॅमरूनच्या ‘अवतार’ मालिकेच्या नवीन चित्रपटाबाबत बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेता गोविंदाने यापूर्वीच धक्कादायक दावा केला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की ‘अवतार’साठी तो पहिली पसंती होता, मात्र त्याने तो प्रस्ताव नाकारला. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले आणि पत्नी सुनीतानेही टोमणा मारत सांगितले की तिला माहिती नाही की हा चित्रपट त्याला नेमका कधी ऑफर झाला होता.
आज पुन्हा एकदा ‘अवतार ३’च्या प्रदर्शितीनंतर गोविंदाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे चर्चा सुरु झाली की गोविंदा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मात्र सत्य वेगळे आहे. हे फोटो आणि क्लिप खरे नाहीत; ते एआय (AI) द्वारे तयार केलेले आहेत. एआयद्वारे बनवलेल्या व्हिडिओ आणि फोटो इतके वास्तववादी दिसत आहेत की अनेक प्रेक्षकांना वाटत आहे की गोविंदा प्रत्यक्ष चित्रपटात आहे.
व्हिडिओमध्ये गोविंदाला निळ्या त्वचेच्या नावीच्या रूपात दाखवले आहे, ज्यामुळे चाहते गोंधळात पडले आहेत. काही व्हायरल फोटोमध्ये तो ‘बत्ती बुझा’ डायलॉग दमदार अंदाजात बोलताना दिसत आहे, तर काही फोटोमध्ये सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांसमोर रंगबिरंगी गुजराती स्टाइल जॅकेटमध्ये जेक सुलीसोबत फ्रेम शेअर करताना दिसत आहे.