नागपूर,
hindu social organization जागतिक शांती व समृद्धीसाठी समरस हिंदू समाज संघटन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. कार्यकारी सदस्य जे. नंदकुमार यांनी केले. संघ शताब्दीनिमित्त सोमलवाडा विभागाने विशेष जनसंगोष्ठीचे आयोजन केले होते. याप्रसंगी नंदकुमार बोलत होते. प्रारंभी त्यांनी व सोमलवाडा भाग संघचालक श्रीकांत चितळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. आदिती कोल्हारकर व चमूच्या वंदेमातरम नंतर श्वेता गर्गे यांनी प्रास्ताविक केले.
जे. नंदकुमार म्हणाले की, रा.स्व. संघ शताब्दी केवळ एक उत्सव नव्हे तर आत्म परीक्षणाच्या रूपात साजरी केली जात आहे. ज्या उद्देशासाठी संघाची स्थापना झाली होती ती पूर्णतः साध्य करण्यासाठी सतत सक्रियता आवश्यक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. केरळचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी अक्कितम अच्युतन नंबुदिरी यांचा संदर्भ देत त्यांनी संघ भारताचा स्वरस म्हणजेच राष्ट्राचा आत्मा असल्याचे सांगितले. केरळचे प्रसिद्ध न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांच्या विचारांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, भारताचे चार मुख्य स्तंभ आहेत लोकशाही, संविधान, शक्तिशाली सेना व रा.स्व. संघ. संघ नसता तर देशाचे आणखी तुकडे झाले असते, हे न्यायमूर्ती थॉमस यांचे मत अधोरेखित झाले. भारतीय इतिहासावर प्रकाश टाकत ते पुढे म्हणाले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे उद्दिष्ट जात, पंथ व पंथांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करणे आहे. जेव्हा समाज त्याच्या परंपरा, शेती पद्धती व जीवनशैलीनुसार जगेल तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळेल.hindu social organization राष्ट्र संकल्पना सांगताना त्यांनी सत्ता आधारित राष्ट्र व भाषा आधारित बहुराष्ट्रीयता सारख्या धारणांमधील भारताला अनादि काळापासून अस्तित्वात राहणारे एक संपन्न राष्ट्र, असे ते म्हणाले. संघाच्या शताब्दी वर्षात राबविल्या पंच-परिवर्तन योजनेची सविस्तर माहिती देताना, त्यांनी सुसंस्कृत कुटुंब व्यवस्था, सामाजिक सौहार्द, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी निष्ठा व नागरी कर्तव्यांवर भर दिला. मतभेेद मिटवून एकत्र यावे, कारण संघ कधीही कोणाची जात विचारत नाही, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रश्नोत्तरे झाली. वेंकटेश सोमलवार व इतर स्वयंसेवकांनी कार्यक्रमास सहकार्य केले.