हिंगणघाट,
laparoscopy-machine : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दुर्बिणद्वारे महिलांच्या कुटुंबकल्याण शिबिरात (दुर्बिण) लेप्रोस्कोपी मशीनमधे बिघाड झाल्याने शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या. त्यानंतर शस्त्रक्रिया न झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ओरड केली. शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्यानंतर डॉटरांनी अन्य रुग्णांना सुंगणी का दिली याचा जाब रुग्ण महिला व नातेवाईकांनी डॉटरांना विचारीत ओरड केली. ही घटना आज २३ रोजी घडली.

उपजिल्हा रुग्णालयात आज दुर्बिणद्वारे महिलांच्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातून लेप्रोस्कोपी दुर्बिण मशीन आणण्यात आली होती. लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मनिषा नासरे व त्यांची चमू या शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. ३२ रुग्ण महिला शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या. १७ व्या रुग्णाची शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक लेप्रोस्कोपी दुर्बिण मशिनीत बिघाड झाल्याचे डॉटरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या महिलेची शस्त्रक्रिया पूर्ण न करता ती तशीच टाके मारून बंद करण्यात आली. मशिनीत बिघाड आल्याने उर्वरित शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या. यातील ४ महिला बिन टायाच्या शस्त्रक्रियेकरिता तयार झाल्या. मात्र उर्वरित ९ रुग्णांपैकी ७ महिलांना सुंगणी देऊन शस्त्रक्रियेसाठी तयार ठेवण्यात आले होते. उर्वरित दोन रुग्णांना घरी सुट्टी देऊन पाठविण्यात आले. सुंगणी दिलेल्या सात महिलांना रुग्णालयात भरती ठेवण्यात आले आहे. सुंगणी दिल्यानंतर त्या महिलाना सुट्टी देण्यात येणार असल्याचे डॉटरांचे म्हणणे आहे.
लेप्रोस्कोपी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही रुग्णांच्या दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत. उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया काही दिवसातच शिबिराचे आयोजन करून करण्यात येईल. सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया न झालेल्या, सुंगणी देऊन भरती असलेल्या महिलांना २४ तासानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. ३२ पैकी १६ रुग्णांवर दुर्बिणीने शस्त्रक्रिया ७ रुग्णांची तयारी झाली होती. त्यातील ४ रुग्ण टायाचे परंपरागत शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार झाले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष लांडे यांनी सांगितले.