पात्र लाभार्थ्यांना डावलून बेकायदेशीर घरकुल वाटप

गंगाधर लोणसावळे यांचे धरणे आंदोलन सुरू

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
eligible beneficiaries जनमत घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना घरकुल वाटप करण्यात आले. हा पात्र लाभार्थ्यांवर अन्याय असून त्याविरोधात सालेभट्टी येथील गंगाधर लोणसावळे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनात बसले आहेत. तालुक्यातील सालेभट्टी येथील जनमत घरकुल योजनेंतर्गत घरकुल वाटपात मोठा घोळ असून पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे. जे अपात्र आहे त्यांना घरकुल यादीत स्थान देण्यात आले आहे. पीएम घरकुल योजनेमध्येही नियमांची पायमल्ली करून नियम धाब्यावर बसवून घरकुल वाटप करण्यात आले.
 

gharkul yojna 
 
 
याविषयी माहिती अधिकारात माहिती मागितली असता अनेक सधन व्यक्ती या यादीत असल्याचे लक्षात आले. यातील काहींचे लग्नही झाले नाही, तर काहींचे कुपनात नावही वेगळे नाही अशा व्यक्तींचे नाव या यादीत आहे, असा आरोप गंगाधर लोणसावळे यांनी केला. याविषयी पंचायत समितीला तक्रार दाखल करण्यात आलेली होती.eligible beneficiaries परंतु याची कोणतीही दखल न घेतल्याने 22 डिसेंबरपासून धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
-----