नवी दिल्ली,
IND W vs SL W 2nd T20I : भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना दणदणीत जिंकला. आज खेळला गेलेला दुसरा सामनाही टीम इंडियाने ७ विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ९ विकेट्स गमावून १२८ धावा केल्या. भारताला विजयासाठी १२९ धावांची आवश्यकता होती. टीम इंडियाने हे लक्ष्य ११.५ षटकांत ७ विकेट्स गमावून पूर्ण केले.
भारत महिला संघातील खेळाडू: स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, श्री चरणी.
श्रीलंका महिला प्लेइंग इलेव्हन: विश्मी गुणरत्ने, चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, कौशानी नुथ्यांगना, मलकी मदारा, इनोका रणवीरा, काव्या कविंदी, शशिनी गिम्हनी.