तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर,
leopard-attack : माहूर तालुक्यातील बामनगुडा येथील शेतात काम करणाèया महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचे तोंड जबड्यात धरून चावल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला सिंदखेड येथे प्राथमिक उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याची घटना 23 रोजी दुपारी 2 वाजता घडल्याने शेतकèयासह नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याला तत्काळ जेर बंद करण्याची मागणी होत आहे.
माहूर तालुक्यात अनेक बिबटे बछड्यासहित धुमाकूळ घालत ओहत. मंगळवारी बामनगुडा येथील शेतात काम करणारी महिला लता सुरेश तोडसाम (वय 35) ही आपल्या मुलगा आणि एका शेजाèयासोबत कापूस वेचण्याचे काम करीत होती. तितक्यात शेताला लागून असलेल्या जंगलातून बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. महिलेचे तोंड जबड्यात पकडल्याने गालावर गंभीर जखम झाली आहे. तर कपाळावर तसेच मानेवरही मोठ्या प्रमाणात दात खोल रुतल्याने जखमा झाल्या आहेत.
समोरील भयानक दृश्य पाहून मुलाने आणि शेजाèयाने जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने महिलेला सोडून जंगलात पळ काढला. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेला सिंदखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉ. बीएम मोरे यांनी प्रथमोपचार करून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. येथे डॉ. मंगेश नागरगोजे, नीलेश भिलावेकर, कक्षसेवक तुळशीदास शेंडे, सुरक्षारक्षक आकाश मुंडे यांनी उपचार केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डॉ. सत्यम गायकवाड चालक सिद्धार्थ भालेराव यांच्या देखरेखीत यवतमाळला पाठवले.