लिओनेल मेस्सीच्या बहिणीचा अपघात

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
मियामी,
Lionel Messi's sister was in an accident अर्जेंटिनाचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी याच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे. मेस्सीची धाकटी बहीण मारिया सोल हिचा अमेरिकेतील मियामी येथे भीषण अपघात झाला असून ती गंभीर जखमी झाली आहे. एसयूव्ही चालवत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघातानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.
 
 
 

messi sister accident 
वैद्यकीय सूत्रांनुसार, मारिया सोलच्या पाठीच्या कण्यात दोन ठिकाणी फ्रॅक्चर, टाचा आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर भाजल्याच्या जखमाही आहेत. मात्र सुदैवाने तिची प्रकृती सध्या स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताचा थेट परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला आहे. येत्या ३ जानेवारी रोजी होणारे तिचे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे. मारिया सोलचे लग्न इंटर मियामी संघाचे प्रशिक्षक ज्युलियन टली अरेलानो यांच्याशी ठरले होते. मात्र, तिच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा होईपर्यंत कोणताही मोठा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.